दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार अभिनेता महेश बाबू ‘डान्स इंडिया डान्स तेलुगू’ या रिअॅलिटी शोमध्ये त्याची मुलगी सितारा घट्टामनेनीसोबत दिसला. यावेळी त्याची मुलगी सितारा हिने तिचे डान्सिंग स्किल्स दाखवले. महेश बाबू आपल्या मुलीचा डान्स पाहून आनंदी दिसत होता. महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा ही खूप हुशार असून सोशल मीडियावर चर्चेत असते.

‘डान्स इंडिया डान्स तेलुगू’ चा हा एपिसोड झी तेलुगूवर रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित होईल. याचाच एक प्रोमो  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महेश बाबू आपल्या मुलीचा हात हातात घेऊन रेड कार्पेटवर चालताना दिसतोय. तिथे दोघेही ग्रँड एंट्री करत स्टेजवर पोहोचतात. तिथे सितारा इतर स्पर्धकांबरोबर डान्स करते आणि महेश बाबू आपल्या मुलीला डान्स करताना कौतुकाने बघत असतो. तसेच ‘डान्स एका उत्सवाप्रमाणे असतो,’ असं तो या कार्यक्रमात म्हणतो.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Pooja Sawant First Makar Sankrant dance video
ऑस्ट्रेलियात पूजा सावंतचा बहिणीसह जबरदस्त डान्स! पहिल्या संक्रांतीला मराठमोळा साज, पाहा व्हिडीओ
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”

दरम्यान, महेश बाबूने दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्यासोबत त्याच्या पुढील चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. १२ वर्षांनंतर महेश बाबू पुन्हा त्रिविक्रमसोबत चित्रपट करणार आहे. याआधी त्याने श्रीनिवासबरोबर २००५ मध्ये ‘अथाडू’ आणि २०१० मध्ये ‘खलेजा’ सारखे हिट चित्रपट केले आहेत. याशिवाय महेश बाबू दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यासोबत बहुप्रतिक्षित चित्रपटात काम करत आहेत. राजामौली सध्या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनमध्ये व्यग्रो असून पुढील वर्षाच्या अखेरीस ते चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहेत.

Story img Loader