दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने कमाईच्या बाबतील अनेक रेकॉर्ड केले आहेत. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अल्लू अर्जुनच्या अभिनयाची प्रशंसा केली. पण सुपरस्टार महेश बाबूने केलेल्या ट्वीटमुळे त्याला ट्रोल केले जात आहे.

महेश बाबूने ‘पुष्पा’ हा चित्रपट पाहिला आणि ट्विटरवर ट्वीट करत अल्लू अर्जुनची प्रशंसा केली आहे. ‘अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट खूप छान आहे. एक उत्कृष्ट कथा आहे. सुकुमारने पुन्हा सिद्ध केले की त्याच्या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनाजवळ असते. एक वेगळाच चित्रपट’ या आशयाचे ट्वीट महेश बाबूने केले आहे.
आणखी वाचा : खुशखबर! ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’

Video: ‘पुष्पा’ चित्रपटातून हटवण्यात आलेला ‘तो’ सीन झाला प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चेत
त्यानंतर आणखी एक ट्वीट करत महेश बाबूने संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. पण महेश बाबूने ट्वीटमध्ये रश्मिकाचा उल्लेख न केल्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. काही नेटकऱ्यांनी रश्मिकाचे नाव न घेतल्यामुळे महेश बाबूला चांगलेच सुनावले आहे.

‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे.