दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचे आज (२८ सप्टेंबर) निधन झाले आहे. त्या ७० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून हैद्राबादमधील एआयजी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंदिरा देवी यांच्या अत्यंसंस्कारादरम्यान महेश बाबूची मुलगी ढसाढसा रडू लागली. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैद्राबाद येथील पद्मालय स्टुडिओ येथे इंदिरा देवी यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. यावेळी विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती, नागार्जुन, अदिवी शेष यांसारखे कलाकार यावेळी इंदिरा देवी यांच्या अंतिम संस्कारासाठी पोहोचले. आपल्या आजीला अखेरचा निरोप देताना महेश बाबूची मुलगी सितारा वडिलांच्या मांडीवर बसून ढसाढसा रडू लागली.

सिताराचं आपल्या आजीशी फार जवळचं नातं असल्याचं या व्हिडीओमधून दिसून येतं. तसेच इंदिरा देवी यांच्या पार्थिवाजवळ गेल्यानंतरही सिताराच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी ती आई नम्रता शिरोडकरला मिठी मारून रडू लागली. महेश बाबूलाही आपल्या मुलीला सांभाळताना अश्रू अनावर झाले.

आणखी वाचा – Video : आधी भावाला गमावलं आता आईचं निधन, इंदिरा देवी यांना अखेरचा निरोप देताना महेश बाबूला अश्रू अनावर

हा व्हायरल व्हिडीओ पाहून चाहत्यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. महेश बाबू यांचे वडील आणि सुपरस्टार कृष्णा गारु यांनी दुसरं लग्न केलं होतं. इंदिरा देवी या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. कृष्णा गारु यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्या एकट्याच राहत होत्या. महेश बाबू यांच्या अनेक कार्यक्रमात इंदिरा देवी आवर्जून उपस्थित असायच्या. कृष्णा गारु आणि इंदिरा देवी यांचा महेश बाबू हा चौथा मुलगा आहे. महेश बाबूचा भाऊ निर्माते रमेश बाबू यांचंही याच वर्षाच्या सुरुवातीला निधन झालं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh babu mother indira devi last rites actor daughter sitara emotional video goes viral on social media kmd