आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर साउथ फिल्म इंडस्ट्रीत यशाचं शिखर गाठणारा सुपरस्टार महेश बाबू आज त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा करतोय. त्याचा आजचा वाढदिवसा आणखी स्पेशल बनवण्यासाठी मेकर्सनी त्याचा नवा चित्रपट ‘सरकारू वारी पाटा’चा टीझर रिलीज करून एक स्पेशल गिफ्ट दिलंय. हा टीझर रिलीज होताच काही वेळातच टीझरने इंटरनेटवर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केलीय. इतका की, अवघ्या १५ तासांमध्येच टीझरने ११ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केलाय. प्रेक्षकांचा हा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून सुपरस्टार महेश बाबू आज त्याच्या वाढदिवशी फारच आनंदात आहे.
बर्थडे बॉय महेश बाबूने आपल्या वाढदिवशी फॅन्सना ट्रीट दिलीय. त्याच्या आगामी ‘सरकारू वारी पाटा’ चित्रपटाच्या मेकर्सनी रिलीज केलेला टीझर महेश बाबूने सुद्धा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या टीझरमध्ये धमाकेदार अॅक्शन पहायला मिळतेय. नेहमीप्रमाणेच सुपरस्टार महेश बाबू याही वेळेला आपल्या स्टायलिश आणि हटके अंदाजात फाईट करताना दिसून येतोय. यात त्याची जबरदस्त अॅक्शन पाहून त्याचे फॅन्स चित्रपटासाठी आतुर झालेले आहेत. तसंच बर्थ डे बॉय महेश बाबू या अभिनेत्री कीर्ति सुरेशसोबत रोमान्स करताना दिसून येतोय. महेश बाबूने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या टीझनला आतापर्यंत ५ लाख ५९ हजार लाईक्स मिळाले आहेत.
View this post on Instagram
सुपरस्टार महेश बाबूचा बहूप्रतिक्षित चित्रपट ‘सरकारू वारी पाटा’चं दिग्दर्शन परशुराम पेटला करत आहेत. चित्रपटच्या मेकर्सनी सुपरस्टार महेश बाबूच्या वाढदिवशी त्याच्या फॅन्ससाठी महेश बाबूच्या अॅक्शनसोबत त्याचा रोमॅण्टिक अंदाज दाखवणारा टीझर शेअर केलाय. या टीझरमध्ये महेश बाबू खूपच हॅंडसम दिसून येतोय, तर त्याच्यासोबत रोमान्स करताना दिसलेली कीर्ति सुरेशने सुद्धा तिचं कौतुक करण्यासाठी प्रेक्षकांना भाग पाडलंय. मिथ्री मूव्ही मेकर्स या चित्रपटाचं प्रोडक्शन करणार आहेत. सध्या या चित्रपटाचं शूटिंग हैद्राबाद इथे सुरू आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच इंटरनेटवर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केलीय. टीझर रिलीज होऊन २४ तास उलटले नाही तर या टीझरने ११ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला असून त्यावर लोकांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.
‘सरकारू वारी पाटा’ हा चित्रपट मकर संक्रांतीच्या आधी 13 जानेवारी २०२२ रोजी थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. महेश बाबूचा हा चित्रपट प्रभासच्या ‘राधे श्याम’ आणि पवन कल्याण-राणा दग्गुबातीचा मल्ल्याळम चित्रपट ‘अय्यप्पनम कोशियुम’च्या तेलुगु रिमेकसोबत क्लॅश होतोय.