दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबूने काही दिवसांपूर्वीच त्याचा चित्रपट ‘मेजर’च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात बॉलिवूडबाबत केलेलं वक्तव्य ‘मी बॉलिवूडला परवडणार नाही’ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत होतं. त्याच्या या वक्तव्यामुळे बराच वाद झाला होता. अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांनी महेश बाबूच्या वक्तव्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. अर्थात नंतर महेश बाबूनं यावर स्पष्टीकरण देत माफी देखील मागितली होती. पण हा विषय इथेच संपलेला नाही. आता नेटकऱ्यांनी त्याच्या या वक्तव्याचा संदर्भ घेऊन त्याला पान मसाल्याची जाहिरात केल्याबद्दल ट्रोल केलं आहे.
मागच्या वर्षी महेश बाबूनं बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत एक पान मसाल्याची जाहिरात केली होती. त्यावरून काही युजर्सनी आता ट्विटरवर महेश बाबूला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर ट्रोल करताना त्यांनी महेश बाबूनं बॉलिवूडबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे. एका युजरनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘महेश बाबू बॉलिवूडकरांना परवडणार नाही पण पान मसाला कंपनीला परवडू शकतो.’ याशिवाय आणखी काही युजर्सनी देखील महेश बाबूच्या बॉलिवूडबद्दलच्या वक्तव्याचा आधार घेऊन पान मसाल्याची जाहिरात केल्यामुळे त्याला ट्रोल केलं आहे.
आणखी वाचा- इम्रान खान घेणार पत्नी अवंतिका मलिकपासून घटस्फोट? चर्चांना उधाण
बॉलिवूड बद्दल काय म्हणाला होता महेश बाबू?
काही दिवसांपूर्वी महेशबाबूनं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. ज्यावरुन मोठा वाद झाला होता. तो म्हणाला होता, “बॉलिवूडला मी परवडणार नाही. त्यामुळे मी हिंदी चित्रपटांवर माझा वेळ अजिबात वाया घालवणार नाही. तसंही मला बॉलिवूडमधून फारशा ऑफर मिळालेल्या नाहीत. त्यामुळे मी इथेच ठीक आहे.”
आणखी वाचा- वयाच्या ४१व्या वर्षी श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते झाले घायाळ
महेश बाबूनं दिलं होतं स्पष्टीकरण
आपल्या वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर महेश बाबून त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. तो म्हणाला, “मी ज्या चित्रपटसृष्टीत काम करत आहे त्या ठिकाणी मी कंफर्टेबल आहे. पण त्यासोबतच मी सर्व भाषांचा आदर करतो.” याशिवाय महेश बाबूच्या या स्पष्टीकरणानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला समर्थन देणारी ट्वीट केली होती.