दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे आज सकाळी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना १३ नोव्हेंबरला हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ७९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृष्णा घट्टामनेनी हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. तेलुगु सुपरस्टार कृष्णा यांनी त्यांच्या अभिनयाने रुपेरी पडदा गाजवला होता. त्यांचं चित्रपटसृष्टीतील योगदान फार मोठं आहे. छोट्या भूमिका साकारत अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केलेल्या कृष्णा यांनी ३५० चित्रपटांत काम केलं होतं. पाच दशकं चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या कृष्णा यांनी १९६१ मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं. १९६५ साली प्रदर्शित झालेल्या थेने मनसुलु’ या चित्रपटात ते पहिल्यांदाच मुख्य नायकाची भूमिका साकारताना दिसले. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या तेलुगू सुपरस्टार कृष्णा यांच्यावर चाहतेही भरभरुन प्रेम करायचे.

हेही वाचा >> Shraddha Murder Case: ‘डेक्सटर’ वेब सीरिज पाहून केले प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे; पण या ‘Dexter’ ची कथा आहे तरी काय?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी पाच दशकं खर्च करणाऱ्या कृष्णा यांच्यावर महेश बाबूने बायोपिक बनवण्याची इच्छा बोलून दाखविली होती. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, एका मुलाखतीत महेश बाबू वडील कृष्णा यांच्या जीवनावर बायोपिक बनवायला आवडेल, असं म्हणाला होता. “माझे वडील माझ्यासाठी दैवत आहेत. त्यांच्यावर बायोपिक आला, तर मला फार आनंद होईल. या बायोपिकमध्ये मला काम करण्याची इच्छा नाही. पण बायोपिकची निर्मिती करायला मला निश्चितच आवडेल”, असं महेश बाबू म्हणाला होता.

हेही वाचा >> सारा खानला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर शुबमन गिलने सोडलं मौन, म्हणाला…

महेश बाबूने वडील कृष्णा यांच्यासह जवळपास २५ चित्रपटांमध्ये काम केलं होतं. बालकलाकार म्हणून महेश बाबूने वडिलांसह स्क्रीन शेअर केली होती. या वर्षाच्या सुरुवातीलाच महेश बाबूच्या भावाचं तर सप्टेंबर महिन्यात आई इंदिरा देवी यांचं निधन झालं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh babu wanted to do biopic on his late father and telugu superstar krishna kak
Show comments