काल तेलुगू सुपरस्टार कृष्णा यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे तेलुगू सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. ते महेश बाबूचे वडील होते. कृष्णा यांनी पाच दशकांपेक्षा जास्त काळ तेलुगू सिनेसृष्टीवर राज्य केले. ३५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा तिन्हीही क्षेत्रामध्ये ते कार्यरत होते. राजकारणातील अनेक दिग्गजांशी त्यांचा स्नेह होता. त्यांनी राजकारणामध्येही सहभाग घेतला होता.

चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी सोशल मीडियाद्वारे कृष्णा यांना आदरांजली वाहिली होती. ज्यूनिअर एनटीआर, अल्लू अर्जून, रामचरण, पवन कल्याण अशा काही सेलिब्रिटींनी त्यांच्या अंत्यसंस्कार विधीच्या कार्यक्रमामध्ये हजर होते. या कार्यक्रमामध्ये महेश बाबूला अश्रू अनावर झाले होते. तेथे त्यांच्यासह त्याची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर, त्यांची दोन मुलंही आणि घट्टामनेनी कुटुंबातील अन्य सदस्य देखील होते.

आणखी वाचा – “मी ब्राह्मण आहे आणि…” अनुपम खेर यांनी दिलेला दिग्दर्शक महेश भट्ट यांना शाप; कारण…

महेश बाबूने सोशल मीडियाद्वारे एक अधिकृत पत्रक जाहीर केले आहे. या पत्रकामध्ये त्याने “अत्यंत दु:खी अंतकरणाने आम्ही आपल्या प्रिय कृष्णा गारुंच्या निधनाची बातमी देत आहोत. चित्रपटांव्यतिरिक्तही ते सुपरस्टार होते. प्रेम, नम्रता आणि करुणा या भावभावनांनी त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले होते. त्यांच्या चित्रपटाद्वारे, कामाद्वारे आणि त्या कामाने प्रभावित झालेल्या चाहत्यांद्वारे ते स्मृती स्वरुपामध्ये अमर आहेत. त्यांंचं आपल्यावर जीवापाड प्रेम होतं. जसंजसे दिवस जातील, तसतसं त्यांची आठवण येत राहणार आहे. पण असं म्हणतात ना, की जोपर्यंत आपण पुन्हा भेट नाही, तोपर्यंत निरोप कायमचा नसतो. – घट्टामनेनी परिवार”, असे लिहिले आहे.

आणखी वाचा – “माझी कंबर आणि…” करण जोहरचा बॉडी शेमिंगबाबत खुलासा, टाइट कपडे परिधान करण्याबाबतही केलं भाष्य

कृष्णा यांच्या निधनामुळे तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. बुधवारपर्यंत चित्रपटांशी संबंधित सर्व काम बंद राहणार आहे. तेलुगू फिल्म प्रोड्यूसर्स काउन्सिलच्या वामी शेखर यांनी ट्विट करत या माहितीची पुष्टी केली आहे.

Story img Loader