दिग्दर्शक महेश भट्ट हे बॉलिवूडमधील चर्चित नाव आहे. आज २० सप्टेंबर रोजी ७४वा वाढदिवस साजरा करत असलेले महेश भट्ट हे त्यांच्या चित्रपटांबरोबरच अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत राहिलेत. त्यांचे लग्न, अफेअर आणि वक्तव्यांची आजही चर्चा केली जाते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात.
महेश भट्ट यांचा जन्म २० सप्टेंबर १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील नानाभाई भट्ट हिंदू होते, तर त्यांची आई शिरीन मोहम्मद अली मुस्लीम होती. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने इतर लग्नांप्रमाणे त्यांच्या पालकांच्या लग्नाला त्याकाळी सामाजिक मान्यता मिळाली नाही. महेश यांचं पालनपोषण त्यांच्या आईने केलं. ते कॉलेजमध्ये असतानाच त्यांना लॉरियन ब्राइट नावाच्या मुलीवर प्रेम झालं. काही काळानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर लोरियनचे नाव बदलून किरण भट्ट ठेवण्यात आले. किरण ही पूजा भट्ट आणि राहुल भट्ट यांची आई आहे. महेश आणि किरणचे लग्न झाल्यानंतरच महेश आणि अभिनेत्री परवीन बाबी यांच्या अफेअरच्या किस्से चर्चेत आले आणि त्यामुळे त्यांचं लग्न धोक्यात आलं होतं. झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, परवीन तिच्या शेवटच्या काळात खूप एकटी होती आणि तिला स्किझोफ्रेनिया नावाचा धोकादायक मानसिक आजार झाला होता. ज्यामध्ये ती प्रत्येकाला स्वतःचा शत्रू मानत होती. अशातच महेश भट्ट यांचे किरणबरोबरचे संबंध बिघडले होते आणि परवीनची मानसिक स्थिती महेशलाही तिच्यापासून दूर नेत होती.
टीव्हीवरील ‘या’ दोन लोकप्रिय सूना बिग बॉसमध्ये दिसणार? समोर आली महत्वाची माहिती
किरण आणि परवीन दोघींपासून दुरावलेल्या महेश भट्ट यांच्या आयु्ष्यात नंतर सोनी राझदान यांची एंट्री झाली. दोघांना प्रेम झालं पण महेश यांनी अधिकृतपणे किरणला घटस्फोट न देताच सोनीशी लग्न केले. महेश यांनी सोनीशी लग्न करण्यासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. महेश आणि सोनी राजदान यांना आलिया आणि शाहीन भट्ट या दोन मुली आहेत.
गौरीला अजिबात आवडत नाही शाहरुखची ‘ही’ सवय; म्हणाली, “त्याच्या या सवयीमुळे पार्टी…”
महेश यांच्या आयुष्यातील सर्वात वादग्रस्त प्रकरण त्यांची मुलगी पूजा भट्ट हिच्याशी संबंधित राहिलं आहे. महेश आणि पूजाने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं, त्यामध्ये दोघे किस करताना दिसले होते. बापलेकीच्या या फोटोवर बरीच टीका झाली होती. याशिवाय रिया चक्रवर्ती आणि दिवंगत अभिनेत्री जिया खान या दोघींशीही महेश भट्ट यांचं नाव जोडलं गेलं होतं.
दरम्यान, महेश भट्ट यांनी २०१८ मध्ये हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना म्हटलं होतं की, “मला माहित नाही की वडिल म्हणजे काय. मला वडील नव्हते. माझ्याकडे वडिलांची कोणतीही अर्थपूर्ण आठवण नाही. त्यामुळे वडिलांची भूमिका काय आहे याची मला कल्पना नाही. मी एकल मुस्लिम आई शिरीन मोहम्मद अलीचं अनैतिक मूल आहे.”