अभिनेत्री सुश्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेअरच्या चर्चांनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ललित मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच सुश्मिता सेनसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर सुश्मिता सेनच्या या अफेअरवर अनेक मीम्स शेअर करण्यता आले आणि तिच्यावर टीका देखील झाली. पण असे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आहेत ज्यांनी सुश्मिताला पाठिंबा दिला आहे. ज्यात प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता महेश भट्ट यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे एकेकाळी सुश्मिता महेश भट्ट यांचा भाऊ विक्रम भट्ट यांना डेट करत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ई-टाइम्स’शी बोलताना महेश भट्ट यांनी सुश्मिता सेनला पाठिंबा देत तिच्या धाडसाचं कौतुक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी नेहमीच तिची प्रेमाने आठवण काढतो. ती एक असामान्य व्यक्ती आहे. ती तिचं आयुष्य स्वतःच्या हिंमतीवर जगत आली आहे आणि मला तिची हीच गोष्ट सर्वाधिक चांगली वाटते. असं आयुष्य २१ शतकात प्रत्येकाने जगायला हवं. जर तुम्हाला वाटतं की कोणी तुमच्यावर आपले विचार लादू नये तर तुम्ही देखील इतर कोणाशीही असं वागू नये. सुश्मिताने नेहमीच तिच्या मनाचं ऐकून आयुष्यातले निर्णय घेतले आहेत. ती आता जे करतेय त्यासाठी मला तिचं कौतुक वाटतं.”

आणखी वाचा- “मी सोन्यापेक्षा हिऱ्यांना प्राधान्य देते”, संपत्तीसाठी लोभी म्हणणाऱ्यांना सुष्मिता सेनचे सडेतोड उत्तर

महेश भट्ट सुश्मिताबद्दल बोलताना पुढे म्हणाले, “मी सुश्मिताबद्दल माझ्या एका मित्राकडून ऐकलं होतं. त्यावेळी तिने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली होती आणि तिने माझ्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं मला माझ्या मित्राने सांगितलं होतं. मी त्यावेळी तिचा फोटो पाहिला. मी नव्या अभिनेत्रीच्या आणि सोबतच नव्या आव्हानाच्या शोधात होतो. त्यामुळे मी तिला एकदा भेटण्याचा निर्णय घेतला. ती योग्य होती पण तिच्यात एक अभिनेत्री होण्याचा कोणताही गुण नव्हता. तिला अभिनय अजिबात येत नव्हता.”

आणखी वाचा- “नेहमी मुलींनाच टार्गेट…” सुश्मिता सेनच्या अफेअरच्या चर्चांनंतर वहिनीची पोस्ट व्हायरल

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट यांनी सुश्मिता सेन आणि विक्रम भट्ट यांच्या अफेअरचा किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले, “मी सुश्मिताला ‘दस्तक’मध्ये काम करण्याची संधी दिली. ‘दस्तक’च्या शुटिंगदरम्यान सुश्मिता आणि विक्रम यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. विक्रम माझा उजवा हात होता. तो सगळ्यात पुढे असायचा. जबाबदारीनं माझी कामं करायचा. त्यामुळे तो बरेचदा तिच्याशी कठोर वागायचा किंवा बोलायचा. असं करत करत त्यांच्यात रोमान्स सुरू झाला. मी सुश्मिताला त्यानंतर एकदाच भेटलो होतो. ती त्यावेळी श्रीजीत मुखर्जीच्या चित्रपटाचं डबिंग करण्यासाठी कोलकाताला जात होती.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh bhatt support sushmita sen after actress affair with lalit modi mrj