बॉलीवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांचा आत्मचरित्रात्मक ‘अर्थ’ (१९८२) चित्रपट आता नाटक स्वरुपात येण्यास सज्ज आहे. त्यावेळी शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा, स्मिता पाटील, राज किरण आणि रोहिनी हट्टंगडी यांची मुख्य भूमिका असलेला ‘अर्थ’ चित्रपट विवाहबाह्य संबंधावर चित्रित करण्यात आला होता. या चित्रपटानंतर भारतीय चित्रपटाचा कायापालट झाल्याचे समजले जाते.
महेश भट्ट यांनी ‘द लास्ट सल्यूट’ आणि ‘ट्रायल ऑफ एरर्स’ यांसारख्या यशस्वी नाटकांची निर्मिती केली आहे. या दोन्ही नाटकांमध्ये अभिनय करणारा ३१ वर्षीय नाट्य कलाकार इमरान झहीद हा त्यांच्या आगामी नाटकातही दिसणार आहे. इमरान याने ‘द लास्ट सल्यूट’मध्ये मुन्तदार अल झैदीन आणि ‘ट्रायल ऑफ एरर्स’मध्ये पत्रकाराची भूमिका केली होती. ” ‘अर्थ’ नाटकामधील मुख्य भूमिका हे माझ्यासाठी एक आव्हान आहे. पण, मी त्यासाठी तयार आहे”, असे इमरान म्हणाला.
‘अर्थ’ चित्रपट नाटक स्वरुपात येण्यास सज्ज!
बॉलीवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांचा आत्मचरित्रात्मक 'अर्थ' (१९८२) चित्रपट आता नाटक स्वरुपात येण्यास सज्ज आहे.
First published on: 25-07-2013 at 07:51 IST
TOPICSमहेश भट्ट
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh bhatts arth set for a comeback in a theatrical production