बॉलीवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांचा आत्मचरित्रात्मक ‘अर्थ’ (१९८२) चित्रपट आता नाटक स्वरुपात येण्यास सज्ज आहे. त्यावेळी शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा, स्मिता पाटील, राज किरण आणि रोहिनी हट्टंगडी यांची मुख्य भूमिका असलेला ‘अर्थ’ चित्रपट विवाहबाह्य संबंधावर चित्रित करण्यात आला होता. या चित्रपटानंतर भारतीय चित्रपटाचा कायापालट झाल्याचे समजले जाते.
महेश भट्ट यांनी ‘द लास्ट सल्यूट’ आणि ‘ट्रायल ऑफ एरर्स’ यांसारख्या यशस्वी नाटकांची निर्मिती केली आहे. या दोन्ही नाटकांमध्ये अभिनय करणारा ३१ वर्षीय नाट्य कलाकार इमरान झहीद हा त्यांच्या आगामी नाटकातही दिसणार आहे. इमरान याने ‘द लास्ट सल्यूट’मध्ये मुन्तदार अल झैदीन आणि ‘ट्रायल ऑफ एरर्स’मध्ये पत्रकाराची भूमिका केली होती. ” ‘अर्थ’ नाटकामधील मुख्य भूमिका हे माझ्यासाठी एक आव्हान आहे. पण, मी त्यासाठी तयार आहे”, असे इमरान म्हणाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा