विनोद हा प्रत्येकासाठी निराशा घालवण्याचा उत्तम उपाय असतो. आपण कितीही गंभीर परिस्थितीत असलो तरी विनोद ऐकताच चुटकी सरशी आपण लगेच हसतो. खरं तर, हसणे हे आपल्या आरोग्यासाठी पण उपयोगी असते आणि सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कॉमेडी शोने महाराष्ट्राला खळखळून हसवले आहे. मजेशीर, भन्नाट विनोदवीरांनी या मंचावर एकापेक्षा एक अफलातून कॉमेडी स्किट सादर करुन हास्यकल्लोळ केला.

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठी प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चं दुसरं पर्व घेऊन येत आहे. या कार्यक्रमाचे पहिले पर्व नुकतेच संपले आणि तेव्हाच दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुस-या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ते म्हणजे सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा परीक्षकपदी पाहायला मिळतील. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Anganewadi Bharadi Devi Jatra celebrations with traditional rituals and vibrant festivities.
Anganewadi Jatra : देवीने कौल दिला अन् ठरली आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख, ‘या’ दिवशी सुरू होणार उत्सव
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
The winter session of Legislature starts December 16 in Nagpur as per Agreement
नागपुरात दरवर्षी विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याबाबत यशवंतराव चव्हाणांचीभूमिका काय होती ?
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग

आठवड्यातील चार दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज असणा-या या दुस-या पर्वाचे दोन वेगळे फॉरमॅट आहेत. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’ हा फॉरमॅट असून महेश कोठारे या दोन दिवसांचे परफॉर्मन्स जज करणार आहेत.  सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, अरुण कदम आणि अंशुमन विचारे हे सहा सेलिब्रिटी कलाकार आणि ८ नवीन कॉमेडीयन्स/ विनोदी कलाकार एकत्र परफॉर्मन्स करणार आहेत. या दुस-या पर्वाच्या शेवटी दोन ‘कॉमेडीचे जहागिरदार’ महेश कोठारे जाहीर करणार.

Video : राजामौलींच्या घरात सनई-चौघडे; प्रभास-अनुष्काचा व्हिडिओ व्हायरल

मंगळवार नंतर मनोरंजनाची गाडी चालू ठेवत सर्व कलाकार मंडळी बुधवार आणि गुरुवारला करणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा- रथी महारथींचा हास्यकल्लोळ’. कार्यक्रमाच्या या दुस-या सेलिब्रिटी फॉरमॅटमध्ये सुप्रसिद्ध कॉमेडियन/ विनोदी कलाकार आणि या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे विजेते या दोन दिवसांत स्किट सादर करणार आहेत. या फॉरमॅटचे परीक्षण सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक करणार असून ‘परफॉर्मर ऑफ द विक’देखील तेच निवडणार आहेत. या फॉरमॅटमध्ये सेलिब्रिटी जोडी अशी असेल- समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर आणि संदीप गायकवाड, अरुण कदम, श्याम राजपुत आणि सुलेखा तळवळकर, अंशुमन विचारे, रोहित चव्हाण आणि रसिका वेंगुर्लेकर, गौरव मोरे आणि वनिता खरात, श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर.

तसेच, होस्ट आणि दोस्त असलेली प्राजक्ता माळी पुन्हा एकदा तिच्या नटखट स्वभावाने या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहे. त्यामुळे दुसरे पर्व तितक्याच ताकदीने पुन्हा प्रेक्षकांसाठी हजर होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ने झाली असून प्रेक्षकांना दुसरे पर्व ७ जानेवारीपासून सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

Story img Loader