मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सई मांजरेकरच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘दबंग ३’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणारी सई मांजरेकर सध्या निर्माता साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सुभान नाडियाडवाला याला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. पण आता सईनं या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सईनं तिच्या अफेअरच्या चर्चांवर भाष्य केलं. ती म्हणाली, ‘मागची १५ वर्ष मी सुभानला ओळखते. आम्ही बालपणापासून एकमेकांचे मित्र आहोत. आम्ही डिनर, लंचला जात असलो तरी आमचं अफेअर वैगरे नाही. आम्ही दोघंही मैत्री व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच नात्यात नाही आहोत. त्यामुळे आम्ही एकमेकांना डेट करत आहोत ही फक्त अफवा आहे. या सर्व गोष्टींमध्ये अजिबात तथ्य नाही.’

सई पुढे म्हणाली, ‘या सर्व गोष्टी समजल्यावर मला काय बोलावं हे कळत नाहीये. माझ्यासाठी हे सर्व खूपच विचित्र आहे. मी शाळेत होते तेव्हा पासून ते आतापर्यंत अशी कोणतीच व्यक्ती नाही ज्यांनी माझ्याबद्दल अशाप्रकारे अफवा पसरवल्या नाहीत. फक्त माझे कुटुंबीय, माझे जवळचे मित्र आणि नातेवाईक यांनाच सत्य माहीत आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत माझ्या आयुष्यात आनंदी आहे.’

दरम्यान सईनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर पहिल्यांदाच तिचं नाव कोणाशी जोडलं गेलं आहे. सुभान आणि सई काही दिवसांपूर्वी लंचला जाताना एकत्र स्पॉट झाले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता सईनं या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सई मांजरेकरच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘मेजर’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय सई सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh majrekar daugter saiee majrekar open up on her dating rumour with subhan nadiadwala mrj