अभिनेते महेश मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीत आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आहेत. त्यांचे दिग्दर्शन असलेला ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा!’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात असलेल्या बोल्ड दृश्यांमुळे राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. या चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य असून ती काढण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. या चित्रपटातील कोणत्या दृश्यांवरून वाद होतोय चला जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाची कथी ही दिवंगत नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर हा चित्रपट आधारीत आहे. १४ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर आधारीत असल्याचं समजतयं. चित्रपटात दाखवण्यात आलेली काही लैंगिकदृष्य काढण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्यांवर चर्चा सुरु झाली होती. या ट्रेलरमध्ये एका महिलेला आणि एका अल्पवयाच्या मुलाला आक्षेपार्ह अवस्थेत दाखवण्यात आलं असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा : मी माझे करिअर न निवडता तुला निवडले पण…; अक्षयसोबत साखरपुडा मोडण्याचे रवीनाने सांगितले होते कारण

आणखी वाचा : अभिषेक बच्चनने जावई व्हावे हेमा मालिनी यांची होती इच्छा, पण ईशा देओलने ‘या’ कारणासाठी दिला होता नका

अल्पवयाच्या मुलांसाठी ही दृष्य उपलब्ध असल्याने यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वादानंतर त्यावर राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यानतंर आयोगानं देखील ती दृश्य चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्राची एक पत्र महिला आयोगाने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेटचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना देखील पाठवली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर चित्रपटाचे निर्माते श्रेयांश हिरावत यांनी हा ट्रेलर हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh manjrekar marathi film nay varan bhat loncha kon nay koncha netizens are opposing this controversial scenes dcp