मराठी सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन असलेला ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा!’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात असलेल्या बोल्ड दृश्यांमुळे राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. या चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य असून ती काढण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबसह सर्व सोशल मीडियावरुन हटवण्यात आला आहे.

महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा!’ या चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित करण्यात आला. दोन मित्रांवर आधारित असलेल्या या क्राइम थ्रिलर चित्रपटात अनेक बोल्ड दृश्य आहेत. चित्रपटात अल्पवयीन मुलं असल्याने अनेक पालकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा पाहायला मिळत होती. या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात त्यावरुन वाद पाहायला मिळत होते.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
devmanus fame kiran gaikwad will get marry with vaishnavi kalyankar on 14 december
Video: मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, मजेशीर व्हिडीओ शेअर करत तारीख केली जाहीर
devmanus Fame Kiran Gaikwad share reel video with future wife Vaishnavi kalyankar
Video: जगणं हे न्यारं झालं जी…; ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडने पहिल्यांदाच होणाऱ्या पत्नीसह Reel व्हिडीओ केला शेअर, पाहा
honey singh documentry on netflix
Yo Yo Honey Singh Famous: हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंटरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; कधी, कुठे प्रदर्शित होणार? वाचा

या ट्रेलरमधील दृश्यांवरून सध्या वाद सुरु आहे. या वादानंतर त्यावर राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यानतंर आयोगानं देखील ती दृश्य चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसेच, हा ट्रेलर तातडीने यूट्यूबवरून काढण्याची देखील मागणी केली आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने दिग्दर्शक महेश मांजरेकरांना लेखी खुलासाही मागवला होता.

महेश मांजरेकरांचा ‘कोन नाय कोनचा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; ट्रेलरमधील दृश्यांवर महिला आयोगाचा आक्षेप!

या संपूर्ण प्रकरणानंतर चित्रपटाचे निर्माते श्रेयांश हिरावत यांनी हा ट्रेलर हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी ‘ई टाइम्स’ला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “सोशल मीडियावर व इतर प्लॅटफॉर्मवर शेअर होत असलेला हा ट्रेलर आम्ही सेन्सॉर केला होता. युट्यूबवर १८ वर्षावरील प्रेक्षकांना तो पाहता येईल, याची काळजी आम्ही घेतली होती. युट्यूबवर जरी वयाची मर्यादा असली तरी इतर प्लॅटफॉर्मवर आमचे नियंत्रण नाही. अनेकांनी तो ट्रेलर डाऊनलोड करुन शेअर केला आहे. या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणे आमच्यासाठी शक्य नव्हते.”

“दरम्यान आम्ही महिला आयोगाने उपस्थित केलेल्या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे. आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. तसेच यावर कोणत्याही प्रकारचे बंडही नको आहे, म्हणूनच आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवरून ट्रेलर हटवला आहे,” असे ते म्हणाले.

Story img Loader