कारकिर्दीच्या योग्य टप्प्यावर काही महत्वाच्या व्यक्तिंचे आशीर्वाद अथवा शुभेच्छा मिळणे फार गरजेचे असते. दिग्दर्शक सुजय डहाकेच्या बाबतीत तसे झाले आहे. एस. व्ही. शिंदे ग्रुप ऑफ कंपनीजच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकण्यासंदर्भातील घोषणा करताना महेश मांजरेकरने सुजय डहाकेची विशेष स्तुती केली. महेश म्हणाला, सुजयचा ‘शाळा’ प्रदर्शित करण्यासाठी मी विशेष पुढाकार घतला तेव्हा एक चांगला चित्रपट प्रेक्षकांसमोर यावा अशीच  त्यामागे भावना होती. तेव्हाच त्याने ‘आजोबा’ चित्रपटाच्या कथा-आशयाबाबत मला संगितले होते. त्याच्या संवेदनशीलतेवर माझा पूर्ण विश्वास असल्याने या चित्रपटाला त्याने नक्कीच न्याय दिला असेल याची मला खात्री आहे, महेशने असे म्हाटल्याने ‘शाळा’मुळे सुजयबद्दलच्या वाढलेल्या अपेक्षेने आपण ‘आजोबा’कडे पाहू हे निश्चित.

Story img Loader