‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. टीव्ही जगतातील सर्वात वादग्रस्त शो प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. ‘बिग बॉस’च्या घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत अनेक चर्चा रंगत आहेत. दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकरच या शोचे सुत्रसंचालक असतील. दरम्यान राजकारणातील कोणती व्यक्ती बिग बॉसच्या घरात त्यांना पाहायला आवडेल याबद्दल त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
आणखी वाचा :“जग फिरलो पण स्वतःची संस्कृती…”, प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष
‘सकाळ’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत बिग बॉसच्या घरात त्यांना संजय राऊत यांना स्पर्धक म्हणून पहायला आवडेल असं महेश मांजरेकर म्हणाले. इतकंच नाही तर, त्यांना संजय राऊत यांना बिग बॉसच्या घरात का पाहायला आवडेल याचं कारणही मांजरेकर यांनी स्पष्ट केलं आहे. “राजकारणातील कोणती व्यक्ती तुम्हाला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल?” असं विचारल्यावर ते म्हणाले, ”मला बिग बॉस मराठीच्या घरात राजकीय नेते संजय राऊत यांना पहायला आवडेल.
बिग बॉसच्या घरात येण्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेपण असावं लागतं आणि ते संजय राऊत यांच्यात आहे. त्यामुळे मला त्याना बिग बॉसच्या घरात पाहायला नक्कीच आवडलं असतं.” फक्त संजय राऊतच नाहीत तर अमोल मिटकरी, नितेश राणे यांनाही बिग बॉसच्या घरात महेश मांजरेकरांना बघायला आवडेल असं लही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकबद्दल मोठी अपडेट; महेश मांजरेकर दिग्दर्शकाच्या भूमिकेतून बाहेर
दरम्यान बिग बॉस मध्ये विविध क्षेत्रातील १६ कलाकार सहभागी होणार आहे. ‘ऑल इज वेल’ ही या नव्या पर्वाची थीम आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.