सुदेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या विनोदाने सजलेल्या या चित्रपटाचा दुसरा पार्टही यावा अशी चाहत्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

‘दे धक्का २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. ‘दे धमाल हसवणुकीचा दुसरा डोस, महेश मांजरेकर दिग्दर्शित, दे धक्का २, तारीख ठरली!!! १ जानेवारी २०२२… थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय’ या आशयाचे ट्वीट अमेय खोपकर यांनी केले आहे. ‘दे धक्का २’ लवकरच भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी आहेत.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?

‘दे धक्का’ हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटाचा कन्नडमध्ये ‘क्रेझी कुटुंब’ म्हणून रिमेक करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केले होते. त्यानंतर आता दे धक्का २ हा चित्रपट १ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. ‘दे धक्का २’मध्ये काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Story img Loader