बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे लग्न कधी होणार? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी भाईजानच्या कुटुंबीयांपासून ते मित्रपरिवार आणि चाहते देखील आतुरतेने वाट पाहात आहेत. आजवर सलमानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. आता नुकताच सलमानचे जवळचे मित्र आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी सलमानच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

महेश मांजरेकर यांनी नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी, ‘कधी कधी मी सलमानसोबत अनेक विषयांवर बोलतो. बऱ्याचदा इतर लोक बोलू शकणार नाहीत त्या विषयावर देखील आमचे बोलणे होते. मी सलमानला म्हणालो होतो की तू लग्न करत नाहीस याचे मला फार वाईट वाटते. माझी इच्छा आहे की तू लग्न करावे. मला सलमानची मुले पाहायची आहेत. अनेकदा तो माझ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. पण मला असे जाणवले की त्याला देखील कुणाची तरी गरज आहे’ असे म्हटले.
आणखी वाचा : भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेच्या ‘पांडू’ चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रदर्शित

पुढे ते म्हणाले, ‘कधी कधी मला असे जाणवते की तो बाहेरुन जितका आनंदी दिसतो तितकाच आतून एकटा आहे. तुम्हाला माहिती असेल सलमान जिथे राहतो तो एक बेडरुम असलेला फ्लॅट आहे. जेव्हा मी त्याच्या घरी जातो तेव्हा तो ड्रॉइंग रुममधील सोफ्यावर झोपलेला असतो. सलमान एक यशस्वी अभिनेता आहे. सलमानचे अनेक मित्रमैत्रीण आहेत. ते सलमावर खूप प्रेम करतात. पण सलमानला जिवापाड प्रेम करणारी कुणी तरी हवी.’

आजवर सलमानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. पण सलमान कधीही त्याच्या नात्यावर उघडपणे बोलला नाही. सध्या सलमान लुलिया वंतुरला डेट करत असल्याचे म्हटले जाते. पण त्याने अद्याप यावर वक्तव्य केले नाही. लुलिया सलमानच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Story img Loader