छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. बिग बॉस मराठीचे हे ३ पर्व सुरु आहे. या शोमध्ये असलेले स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि शोमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या शोचे सुत्रसंचालक अभिनेते महेश मांजरेकर आहेत. यावेळी एका नव्या लूकमध्ये महेश त्यांच्या चाहत्यांना भेटायला आले आहेत. तर प्रत्येक एपिसोडसाठी महेश किती मानधन घेत असतील? हे जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना लागून आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेश मांजरेकर यांची सुत्रसंचालन करण्याची पद्धत प्रेक्षकांना प्रचंड आवडते. महेश मांजरेकर यांच्या शिवाय ‘बिग बॉस मराठी’ हा जसा अधुरा आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी महेश हे खूप मोठी किंमत देखील घेतात. रिपोर्टनुसार, महेश एका एपिसोडसाठी २५ लाख रुपये घेतात. आठवड्यात २ एपिसोडचे सुत्रसंचालन महेश करतात. याचाच अर्थ ते एका आठवड्यासाठी ५० लाख रूपये मानधन घेतात.

आणखी वाचा : रकुल प्रीत सिंगने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली

आणखी वाचा : “जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल

महेश मांजरेकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी मूत्राशयाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे ते बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करतील की नाही, अशी शंका प्रेक्षकांना होती. बिग बॉस मराठीची ऑफर स्वीकारण्यापूर्वी महेश मांजरेकर हे ‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर काम करत होते. ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात सलमान खान आणि मेहूणा आयुष शर्मा दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh manjrekar took huge amount for a single episode of bigg boss marathi 3 dcp