‘देव डी’, ‘साहेब बीबी और गॅंगस्टार’ आणि ‘पान सिंह तोमर’ या चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे माही गिल. माही गिलने आता पर्यंत अनेक बोल्ड भूमिका साकारल्यामुळे आज तिच्याकडे एक बोल्ड अभिनेत्री म्हणून पाहिले जाते. परंतु नेहमी बोल्ड भूमिका साकारणे कंटाळवाणे असते असा खुलासा माहीने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.

माही लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणार आहे. ती ‘झी5’वरील ‘पोशम पा’ या चित्रपटात वेश्या महिलेची भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीदरम्यान माहीला या भूमिकेबद्दल विचारण्यात आले होते. ‘एक अभिनेत्री म्हणून मला विविध भूमिका साकारायला आवडतात आणि कोणत्याही भूमिकेसाठी मी नकार देत नाही. पण मला नेहमी एकाच प्रकारच्या भूमिकेच्या ऑफर मिळतात. लोकांना नेहमी एखादी बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री कास्ट करायची असते तेव्हा ते मला फोन करतात’ असे माही म्हणाली.

‘खरं बोलयचे झाले तर बोल्ड भूमिका साकारणे कंटाळवाणे आहे. हळूहळू मी आव्हानात्मक भूमिका साकारण्यास सुरुवात केली आहे’ असे माही पुढे म्हणाली आहे.

‘पोशम पा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमन मुखोपाध्याय करणार असून या चित्रपटात रागिनी खन्ना आणि सयानी गुप्ता देखील मु्ख्य भूमिकेत दिसणार आहे. पंजाबी असल्यामुळे या चित्रपटातील मराठी महिलेची भूमिका साकारणे माहीसाठी आव्हानात्मक असल्याचे तिने सांगितले. ‘या भूमिकेचे पैलू पाहण्यासारखे आहेत. एक वेश्या म्हणून या चित्रपटात तिचा प्रवास सुरु होतो. नंतर ती मोलकरणीच्या भूमिकेत दिसते आणि तिला दोन मुले असतात. तिच्यावर ओढावलेल्या परिस्थितीमुळे तिची स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण होते. मला या भूमिकेचा जीवन प्रवास आवडला आहे’ असा खुलासा माहीने केला आहे.

Story img Loader