माही गीलने ‘गॅग्ज ऑफ घोस्ट’ या आपल्या आगामी चित्रपटातील एका गाण्यासाठी मीना कुमारीकडून प्रेरणा घेतली आहे. माही गील म्हणाली, मी मीना कुमारीची खूप मोठी चाहती असून, मोठ्या पडद्यावर तिच्यासारखी अदाकारी साकारायला मिळणे, हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे. ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीना कुमारीद्वारे प्रेरीत असलेल्या ‘नहीं दूंगी, नहीं दूंगी, दिल मेरा फोकट में नहीं दूंगी’ या गाण्यासाठी माहीने खूप मेहनत घेतली.
दिग्दर्शक सतीश कौशिक म्हणाला, चित्रपटातील या गाण्यामुळे जुन्या जमान्यातील दिवसांची आठवण व्हावी, ही आमची इच्छा होती. यासाठी माहीला या गाण्यात मीना कुमारीच्या रुपात सादर करण्यात आले असून, तिने आपले काम उत्कृष्टपणे केले आहे.

Story img Loader