अफगाणिस्तावर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर तिथल्या महिलांवर पुन्हा एकदा संकट ओढावलं आहे. तालिबानमधील महिलांच्या परिस्थितीवर अनेक अभिनेत्रींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यातच आता टीव्ही अभिनेत्री महिका शर्माने तालिबानमधील महिलांच्या बचावासाठी एक युक्ती लढवली आहे. एक ट्वीट करत महिकाने तिच्या डोक्यात आलेली कल्पना मांडली आहे. जेणेकरून तालिबानांमध्ये महिलांविषयी आदर निर्माण होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिकाने तालिबानमध्ये महिलांच्या होणाऱ्या छळाबद्दल चिंता व्यक्ती केली. यावेळी महिकाने तिच्या ट्वीटमध्ये ती तालिबान्यांना राखी बांधणार असल्याचं म्हणाली आहे. रक्षाबंधनच्या दोन दिवस आधी महिकाने एक ट्वीट केलंय. यात ती म्हणाली, “मी अफगाणिस्तानच्या महिलांना वाचवण्यासाठी येत आहे. मी रक्षाबंधनला सर्व तालिबान्यांना राखी बांधून त्यांना भाऊ बनवणार आहे. त्यानंतर बहीण म्हणून मी त्यांना चांगलाच चोप देऊन महिलांचा आदर करण्यास शिकवेन. त्याना आई, बहीण, मुली नाहीत का म्हणून ते असे गुन्हे करत आहेत?” हे ट्वीट करत महिकाने पंतप्रधान मोदींना तिची कल्पना कशी वाटली असा सवाल देखील केलाय.

महिकाच्या या ट्वीटला अनेकांनी पसंती दिलीय. तर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, “कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण ते रक्षाबंधन साजरा करत नाहित. आणि बहीण भावाच्या पवित्र नात्यावरही त्यांचा विश्वास नाही. तरही जायचं असेलच तर जाऊन बघा”

महिकाने काही मालिकांमध्ये तसचं काही सिनेमांमध्ये काम केलंय. तसचं उत्तर भारतातील एका सौदर्य स्पर्धेची ती विजेती ठरली होती.