Anupam Kher on Mahima Chaudhry Breast Cance : काही आठवड्यांपूर्वी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री छवि मित्तलने तिच्या स्तनाच्या कर्करोगबद्दल सांगितले होते. आता महिमा चौधरीने तिच्या स्तनाच्या कर्करोगबद्दल खुलासा केला आहे. महिमा चौधरीची केमोथेरपी झाली, त्यामुळे तिचे सर्व केस गळले आहेत. महिमा चौधरीनेही स्तनाच्या कर्करोगाची बातमी पालकांपासून लपवून ठेवली होती. आता अभिनेता अनुपम खेर यांनी महिमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्तनाच्या कर्करोगबद्दल सांगताना दिसत आहे.

आणखी वाचा : शैलेश लोढानंतर टप्पू सोडणार ‘तारक मेहता…’ मालिका, चर्चांना उधाण

hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”
Hina Khan
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हीना खानने शेअर केले रुग्णालयातील फोटो; म्हणाली, “उपचाराच्या या ठिकाणी…”
Lakshmi Niwas Fame Meenakshi Rathod Daughter Yara sing Majha Bhimraya song
Video: ‘लक्ष्मी निवास’ नव्या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीच्या चिमुकल्या लेकीनं गायलं ‘माझा भिमराया’ गाणं, व्हिडीओ पाहून कराल कौतुक

अनुपम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये महिमाने तिला स्तनाचा कर्करोग कधी आणि कसा झाला याविषयी सांगितले आहे. जेव्हा त्यांनी महिमा चौधरीला त्यांच्या ‘The Signature ’ या चित्रपटासाठी बोलावले, त्यावेळी त्यांना अभिनेत्रीच्या स्तनाच्या कर्करोगाची माहिती मिळाली, असे अनुपम यांनी सांगितले. मात्र, महिमाने आता चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा : Kon Honar Crorepati 6 : “मी मराठीतून प्रश्न विचारणार”, हे ऐकताच काजोलन केले असे काही

आणखी वाचा : मलायकाच्या घरी पोहोचले पोलिस, व्हिडीओ व्हायरल होताच कारण आले समोर

स्तनाच्या कर्करोगबद्दल बोलताना महिमा चौधरी रडत म्हणाली, “माझ्यात कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. मी दरवर्षी रुटीन चेकअप करते, ज्यामध्ये रक्त तपासणी, सोनोग्राफी सगळ्या टेस्ट केल्या जातात. माझी सोनोग्राफी करणार्‍या डॉक्टरांनी मला सांगितले की तुम्ही डॉक्टर मंदार जो ऑन्कोलॉजिस्ट आहे त्यांना भेटा. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी डॉक्टर मंदार यांना भेटले, तेव्हा ते म्हणाले की हे प्री-कॅन्सर सेल्स आहेत, ज्यांना DCIS म्हणतात. काहीवेळा ते कर्करोगाचे रूप धारण करतात आणि काहीवेळा घेत नाहीत. यासाठी बायॉप्सी करू, बाकी अजून काही दिसत नाही.”

आणखी वाचा : विचित्र कपड्यांवरून ट्रोल होणाऱ्या उर्फी जावेदची एकूण संपत्ती आणि कमाई ऐकलीत का?

पुढे महिमा म्हणाली, “डॉक्टरांनी पुन्हा मला सांगितले की या पेशी काढायच्या आहेत की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. मी लगेच म्हणाले, कृपया लगेच काढा. त्यामुळे माझी बायोप्सी केली आणि त्यात कर्करोग निघाला नाही, पण तरीही मला ते सेल्स काढून टाकायचे होते. जेव्हा त्यांनी त्या पेशी बाहेर काढल्या आणि त्यांची बायोप्सी केली तेव्हा त्यांना दिसले की एका बाजूला कर्करोग झाला आहे.”

आणखी वाचा : कोण आहे सोनाक्षीचा बॉयफ्रेंड जहीर इक्बाल? तिच्या आधी ‘या’ दोन अभिनेत्रींसोबत होता रिलेशनशिपमध्ये

महिमा पुढे म्हणाली, “डॉक्टरांनी सांगितले की, जेव्हा तुमची शस्त्रक्रिया होत होती, तेव्हा आम्ही मानेमध्ये एक पोर्ट टाकला आहे आणि आम्हाला केमोथेरपी द्यावी लागेल. मी रडायला लागले. मी हे माझ्या आई-वडिलांना सांगितले नाही कारण कर्करोगाचे नाव ऐकताच लोक घाबरतात. मी तिच्यापासून गेल्या २ वर्षांपासून दूर होते कारण ती परिचारिकांमध्ये होती. यासगळ्यात मी तिला १० दिवस भेटू शकले नाही. तर मी आईला सांगितले की माझ्या स्तनात एक गाठ आहे, म्हणून मी ती गाठ काढली आहे. यामुळे मी तुला १० दिवस भेटू शकले नाही. हे ऐकून माझ्या आई-वडिलांचा बीपी वर-खाली होऊ लागला आणि आई बेशुद्ध होतं होती.”

आणखी वाचा : अक्षयला होती सासू डिंपल कपाडियासोबत डेटवर जाण्याची इच्छा, कारण…

कर्करोगावर उपचार झाल्यामुळे महिमा आनंदी आहे. अनुपम यांनी महिमाला केवळ धीर दिला नाही तर तिला पाठिंबाही दिला आणि यासाठी तिने त्यांचे आभार मानले. त्यासाठी आभार मानत महिमा पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही मला चित्रपटासाठी विचार करण्यासाठी फोन केला होता, तेव्हा मी तुम्हाला प्रश्न केला होता की विग घालून सेटवर येऊ शकते का? मग तुम्ही विचारलं विग कशाला? यावर तुम्हाला उत्तर देताना मी तुम्हाला सांगितलं की माझे सतत सुरु असलेल्या उपचारांमुळे माझे केस गेले आहेत. तेव्हा तुम्ही म्हणालात की मग विग का घालायची?, विगशिवाय चित्रपट का करू शकत नाही? तुम्ही मला पाठिंबा दिलात त्यासाठी मी आभारी आहे.”

आणखी वाचा : ‘पीट सॅमप्रसने फेमस केलेली अर्धी चड्डी पण वीस वर्षांपूर्वी अशोक सराफने…’, सुनील गावस्करांनी सांगितला मजेशीर किस्सा

महिमाने १९९७ मध्ये शाहरुख खानच्या ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर २०१६ पासून महिमा अभिनयापासून लांब झाली. २०१६ मधला ‘डार्क चॉकलेट’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. आता ती अनुपम यांच्या ‘द सिग्नेचर’ या चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader