बॉलीवूडचा बादशाहा शाहरुख खानच्या आगामी ‘रईस’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यातील मियाँ भाई शाहरुखचा लूकही त्याच्या पोस्टरद्वारे झळकला. पण, या चित्रपटाची विशेष गोष्ट शाहरुख नाही तर या चित्रपटातून पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय हे आहे. तसेच, यात नवाजुद्दीन सिद्दीकी हासुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
असे ऐकण्यात आले आहे की, ‘रईस’मध्ये महिरा आणि नवाजुद्दीन यांच्यात एक प्रणयदृश्य आहे. खरं तर यात नवाजुद्दीन महिरासोबत जबरदस्तीने प्रणय करण्याचा प्रयत्न करतो. पण, हे दृश्य करण्यास महिराने नकार दिल्याचे कळते. मात्र, स्क्रिप्टची मागणी असल्याचे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे. त्यामुळे नाइलाजास्तव तिच्या मनात नसतानाही जर तिला हे दृश्य करावे लागते का? हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahira khan refused to do a lovemaking scene with nawazuddin siddiqui