छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून विराजस कुलकर्णी ओळखले जाते. विराजस कुलकर्णी हा महिनाभरापूर्वी विवाहबंधनात अडकला. विराजसने अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत लगीनगाठ बांधली. सध्या तो शिवानीसोबत क्वॉलिटी टाइम घालवताना दिसत आहे. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. नुकतंच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराजसने नुकतंच त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या त्याने फ्लोरल प्रिंट असलेला शर्ट, स्पेक्स घातलेला फोटो शेअर केला आहे. तो ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील आहे. ‘मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये, कारण अधून मधून उठावं लागतं’. असे त्याने या पोस्टमध्ये कॅप्शन देताना म्हटले आहे.

“…त्यादिवशीही मला शूटींगला आल्यासारखं वाटत होतं”, विराजसने सांगितला लग्नादरम्यानचा ‘तो’ किस्सा

विराजसची ही पोस्ट पाहून अनेक चाहते तर्क वितर्क लावताना दिसत आहेत. विराजसच्या पोस्टवरही अनेकांनी कमेंट करत त्याची खिल्ली उडवली आहे. ‘लग्न झालं आता तुझं, आता असचं होणार’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. नवीन लग्न झालं की अधून मधून रात्री उठणं स्वाभाविकच आहे, असेही एकाने कमेंटमध्ये म्हटले आहे.

“मी सिलेंडरवर बसून होम मिनिस्टरचा तो एपिसोड शूट केला”, आदेश बांदेकरांनी सांगितला किस्सा

दरम्यान विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्या लग्नाला काही दिवसांपूर्वी एक महिना पूर्ण झाला. अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी विराजस-शिवानी विवाहबंधनात अडकले. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर विराजस-शिवानीने त्यांच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. नुकतंच विराजसच्या ‘मिकी’ या विनोदी नाटकाचा प्रयोग पुण्यात पार पडला. या नाटकात विराजसनं सखाराम चव्हाण हे पात्र साकारलं आहे. तर शिवानी ही लवकरच ‘SHE’ या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majha hoshil na fame actor virajas kulkarni instagram post viral said i have not slept in last three days nrp