झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे तिला विशेष पसंती मिळत आहे. या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहा कामत ही भूमिका साकारत आहे. नुकतंच या मालिकेत नेहा आणि यशचे लग्न पार पडले आहे. त्यामुळे मालिकेत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुकतंच प्रार्थनाचा मालिकेतील नवा लूक समोर आला आहे.
प्रार्थना ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने नेहाच्या व्यक्तिरेखेतील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यात प्रार्थना ही छान तयार होताना दिसत आहे. यावेळी एक हेअर ड्रेसर तिचे केस सेट करताना दिसत आहे.
विशेष म्हणजे यावेळी नेहाने छान डिझायनर साडीही परिधान केली आहे. यात ती छान नटून थटून तयारी करत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत नेहा ही मंगळसूत्र, बांगड्यांकडे बघत असल्याचे दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवरुन ती नेहा चौधरीची भूमिका एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे. या दोन्हीही व्हिडीओला कॅप्शन देताना नेहाचे नवीन रुप…, असे तिने म्हटले आहे.
‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप का ठरला? दिग्दर्शक म्हणाला “या चित्रपटाला राजकीय…”
दरम्यान सध्या या मालिकेत एक छान सुखद गोष्टी पाहायला मिळत आहे. नेहा आणि यशचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले आहे. त्यांच्या लग्नातील सर्व विधीही मोठ्या थाटामाटात करण्यात आल्या आहेत. यामुळे पॅलेसमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र यापुढे या मालिकेत काय होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण या ट्विस्टमुळे या मालिकेविषय़ी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.