छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेतील यश नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. इतकंच नव्हे तर या मालिकेतील आजोबा, बंडू काका काकी, समीर, शेफाली, सिम्मी या आणि अशा इतर व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात.
यश नेहा प्रमाणेच अजून एक जोडी प्रेक्षकांना बघायला आवडते ते म्हणजे समीर आणि शेफालीची. त्या दोघांमधील नोकझोक प्रेमात कधी बदलणार याची वाट प्रेक्षक पाहत आहेत. समीर आणि शेफालीचं जुळवून देण्यासाठी आता या मालिकेत एका अभिनेत्रीची एण्ट्री होणार आहे. शेफालीची आई मोहिनीही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री गौरी केंद्रे साकारणार आहेत. ही एक मजेदार भूमिका असणार आहे जी पाहताना प्रेक्षकांना नक्कीच आनंद होईल. या व्यक्तिरेखेच्या एण्ट्रीमुळे समीर आणि शेफाली यांची मैत्री प्रेमात बदलेल का? हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळतील.
आणखी वाचा : वयाच्या ७९ व्या वर्षी अमिताभ बच्चन यांची हाय कीक पाहून; टायगर श्रॉफलाही फुटला घाम, म्हणाला…
आणखी वाचा : “हे वैयक्तिक मत आहे…”, अक्षयच्या माफीनाम्यानंतर अजय देवगणने केले वक्तव्य चर्चेत
या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री गौरी केंद्रे म्हणाल्या, “माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आहे. या लोकप्रिय मालिकेत एका रंजक वळणावर मोहिनी या व्यक्तिरेखेची एण्ट्री होतेय. मी मोहिनी म्हणजेच शेफालीच्या आईची भूमिका साकारतेय जी एक हसमुख व्यक्ती आहे. मोहिनीमुळे प्रेक्षकांना मालिका पाहताना मज्जा येईल. ही मोहिनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.”