झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी, अजित केळकर या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. पण या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेत यशच्या आजोबांची भूमिका साकारणारे अभिनेते मोहन जोशी यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. नुकतंच याबाबतची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेते मोहन जोशी यांनी जगन्नाथ चौधरी हे पात्र साकारलं होतं. त्यांनी साकारलेली यशच्या आजोबांची भूमिका चांगलीच चर्चेत होती. त्याची ही भूमिका चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. मात्र नुकतंच त्यांनी ही मालिका सोडल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. त्यांनी ही मालिका का सोडली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

‘द कश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतर गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “हा चित्रपट…”

गेल्या अनेक भागांमध्ये मोहन जोशी हे या मालिकेत पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे त्यांनी या मालिकेतून का एक्झिट घेतल्याच्या अनेक चर्चा समोर आल्या होत्या. मात्र नुकतंच यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मराठी सिरिअल या इन्स्टाग्राम पेजने याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान मोहन जोशी यांची ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर साकारणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र त्यांनी अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majhi tujhi reshimgathi jagannath choudhari fame actor mohan joshi took exit from serial nrp