झी मराठी वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत राधिका सुभेदार हे पात्र साकारणारी अभिनेत्री अनिता दाते ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढण्यात आले होते. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली असा आरोप किरण माने यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर अनिता दातेने दोन पोस्ट शेअर केल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिता दाते या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिने काही तासांपूर्वी लिहिलेल्या एका पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. नुकतंच एका नेटकऱ्याने एसटी कर्मचाऱ्यांवरुन तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर तिनेही सडेतोड उत्तर दिले आहे.

एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करा, या मागणीसाठी २८ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप सुरू झाला. दोन महिने उलटूनही तो सुरुच आहे. एसटीची ४५ आगारे अद्यापही पूर्ण बंद आहेत, तर ६० हजारांहून अधिक कर्मचारी अद्यापही संपावर आहेत. या सर्व प्रकरणावरून एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे.

“मी कलाकार म्हणून…”, किरण माने प्रकरणी ‘स्टार प्रवाह’ने स्पष्टीकरण दिल्यानंतर अभिनेत्री अनिता दातेची प्रतिक्रिया

तो म्हणाला, “ST कर्मचाऱ्यांच्या बाजूने एखादी पोस्ट लिहिली असती तर बरे वाटले असते… बाकी हे सर्व प्रसिध्दीसाठी तुम्ही करत आहात हे तर दिसून आलेच…आता कदाचित कोट्यातून तुम्हालाही फ्लॅट मंजूर होईल… असो,” असे त्याने म्हटले आहे.

यावर तिनेही सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. “सॉरी मी कलाकार आहे म्हणून त्याची बाजू मला नीट कळतेय असं मला वाटतं. एसटी कर्मचारी अथवा अनेक विषय माझ्या आकलनाच्या पलीकडे आहेत. मी सर्वज्ञ नाही. मला माफ करा. मला कोट्यातला फ्लॅट नको आहे. हल्ली कन्स्ट्रक्शन चांगली नसतात असं ऐकलंय. आमची मेहनत करून कमावलेली जागा बेस्ट आहे. कलाकार म्हणून प्रसिध्दी मिळवायला अनेक सोपे मार्ग आहेत. हे फारच वेळ खाऊ काम आहे. इथे प्रसिध्दी नाही कुप्रसिद्ध होतेय मी दिसत नाही का तुम्हाला?”, असा प्रश्नही तिने केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majhya navryachi bayko anita date post social media comment on answer viral nrp