गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘शार्क टँक इंडिया’ या रिअॅलिटी शो चर्चेत आहे. या शोमध्ये व्यवसायाची आगळीवेगळी कल्पना मांडणाऱ्या युवा व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी निधी दिला जातो. दरम्यान, आता ‘शार्क टँक इंडिया’ या शोवर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ‘शार्क टँक इंडिया’च्या मंचावर मकरंद अनासपुरे आल्याचं पाहायला मिळत आहे. मकरंद यांच्या दे धक्का या चित्रपटातील काही सीन या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहेत. सुरुवातीला मकरंद हे मंचावर येतात आणि त्यांच्या समोर असलेले परिक्षक यांच्यात संवाद होतो अस दाखवण्यात आलं आहे. संवाद सुरु असताना मकरंद त्याच्या इंजिनीविषयी माहिती सांगतात. त्यानंतर एक परिक्षक मकरंद यांना १ कोटी रुपयांची ऑफर देतात. हे ऐकल्यानंतर मकंरद आश्चर्य चकीत होतात. या पूर्ण व्हिडीओमध्ये दे धक्काचे सीन दाखवण्यात आले आहेत. हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : “उद्धवदादा तुम्ही बाळासाहेबांचे…”, वाइन विक्रीवरून बिचुकलेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
आणखी वाचा : अभिनेत्रीने अंतर्वस्त्र काढणाऱ्या सीनमुळे मुस्लिमबहुल देशांमध्ये संतापाची लाट
दरम्यान, जागतिक पातळीवर गाजलेल्या एका बिझनेस रिअॅलिटी शोचा हा पहिला सीझन आहे. तर हा शो पहिल्यांदाच आपल्या देशात सादर केला आहे. देशातील अनेक व्यक्तीने या शोच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायाच्या पुढं घेऊण जाण्याचं स्वप्न पाहिलं. यावेळी अनेक लोकांना त्यांच्या भन्नाट अशा अनेक कल्पना परिक्षकांसमोर ठेवल्या आहेत. शोमध्ये अश्नीर ग्रोव्हर , पियुष बन्सल ,नमिता थापर , विनिता सिंग, अनुपम मित्तल परिक्षक आहेत.