अभिनेता मकरंद अनासपुरेचा नवा चित्रपट ‘छापा काटा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे धमाकेदार भूमिकेत दिसणार आहे. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ या धमाल विनोदी चित्रपटाचा २४ नोव्हेंबर रोजी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून हा चित्रपट १५ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘ढ लेकाचा’, ‘कुलस्वामिनी’, ‘बोल हरी बोल’ आणि ‘हिरा फेरी’ या चित्रपटांनंतर ‘अल्ट्रा मीडियातर्फे ‘छापा काटा’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या पटकथा आणि दिग्दर्शनाची धुरा संदीप मनोहर नवरे यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्याबरोबर मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे कलाकार प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.