अभिनेता जितेंद्र जोशी सूत्रसंचालन करत असलेला ‘दोन स्पेशल’ हा शो सतत चर्चेत असतो. शोमध्ये हजेरी लावणारे पाहुणे कालाकार त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील कधी न समोर आलेल्या काही खास गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. नुकताच या शोमध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि मकरंद अनासपुरे यांनी हजेरी लावली. दरम्यान मकरंद अनासपुरेने CID मालिकेच्या सेटवर घडलेला गमतीशीर किस्सा सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेते शिवाजी साठम आणि CID मालिकेचे लेखक बी. पी सिंग या दोघांची घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे शिवाजी साठम यांनी माझा फोटो बी. पी. सिंग यांना देऊन हा खूप चांगला अभिनेता आहे असे सांगितले. त्यामुळे मला CID मालिकेत भूमिका मिळाली. मी मालिकेच्या चित्रीकरणासाठी मी गेलो. त्यावेळी माझी आणि बी. पी. सिंग यांची ओळख नव्हती. त्यामुळे त्यांना भेटल्यावर नमस्कार तर करायला हवा. म्हणून मी त्यांच्या जवळ गेलो. तेव्हा ते मालिकेचा एपिसोड लिहित होते असे मकरंद म्हणाला.

मी त्यांना गुड मॉर्निंग सर म्हणालो. त्यांनी मला क्या है? असे विचारले. मी मकरंद अनासपुरे असे त्यांना सांगितले. ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी चष्मा काढला. अरे यार! शिवाजीने जो फोटो भेजा था उसमे तो मुझे लगा था कि कोई अच्छा खासा बंदा है. पर अब मुझे स्क्रिप्ट बदलना पडेगा असे ते म्हणाले. या मालिकेत माझे CID ज्यूनिअर ऑफिसर असे कास्टिंग होते. मग त्यांनी ते बदलून CID ज्यूनिअर ट्रेनी कॉन्टेबल केल्याचा मजेशीर किस्सा मकरंद अनासपुरेने सांगितला आहे.