पाणी आणि पुरी दोन्हीचा मेळ अचूक जमून आला तरच पाणीपुरी चटकदार लागते, असं नात्यांची चटकदार गोष्ट मांडणाऱ्या ‘पाणीपुरी’ या चित्रपटात ऐकायला मिळतं. ही बाब तशी सगळ्याच गोष्टींना अगदी मसालेदार मनोरंजन करणाऱ्या चित्रपटालाही लागू पडते. छोट्या-मोठ्या कारणांवरून पती-पत्नींमध्ये होणारे वादविवाद, त्यातून एकमेकांशी संवाद साधण्यापेक्षा घेतले जाणारे टोकाचे निर्णय यामुळे सध्या वाढत चाललेले घटस्फोट या विषयावर भाष्य करणारा रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित ‘पाणीपुरी’ हा चित्रपट मनोरंजनाच्या बाबतीत चटकदार झाला असला तरी विषयाचा गाभा पकडण्यात मात्र तो यशस्वी ठरत नाही.

‘पाणीपुरी’ या चित्रपटाची मांडणी करताना ढोबळ मानाने दोन केंद्रबिंदू घेऊन कथाविस्तार करण्यात आला आहे. हमखास घटस्फोट मिळवून देणारे आणि त्यासाठी प्रसिद्ध असलेले वकील यशवंत जमादार ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. जमादार यांच्या वैयक्तिक कथेची जोडही त्यात आहे. त्यांच्याशी घटस्फोटाच्या निर्णयाप्रत आलेली काही जोडपी जोडली जातात आणि आयुष्यात कधी नव्हे ते नाती तोडण्यासाठी प्रसिद्ध असलेले जमादार ही नाती सांधण्यासाठी कसे प्रयत्न करतात त्याची कथा या चित्रपटात पाहायला मिळते. प्रत्येक जोडपं वेगळं, त्यांची कथा-व्यथा वेगळी असते. त्यामुळे अशा काही प्रातिनिधिक जोडप्यांच्या कथा घेऊन या विषयावर चित्रपट करायचा म्हटलं तरी यावर सगळ्यांसाठी एकच तोड असू शकत नाही. त्यामुळे वकिली चष्म्यातून आणि वैयक्तिक अनुभवातून जमादार या जोडप्यांमधील संघर्षाचे मूळ कारण शोधतात. जोडप्यांमधील दोघांचे स्वभाव, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा आणि नेमकं खुपतंय काय हे शोधून त्यांच्याशी संवाद साधण्याचे जमादार यांचे प्रयत्न या कथेत महत्त्वाचे आहेत. मात्र आधी उल्लेख केला तसं घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये सगळ्यांसाठी एकच एक तोड किंवा उत्तर असू शकत नाही. त्यामुळे मांडणी करताना या जोडप्यांमधील वादविवाद आणि गमतीशीर पात्रांची पेरणी करत साधलेले प्रासंगिक विनोद यावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यातल्या त्यात तोडण्यापेक्षा जोडण्यावर भर द्या आणि त्यासाठी किमान एकमेकांशी संवाद साधा, हा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित होईल अशा बेतानेच हलकीफुलकी मांडणी करत मनोरंजन करण्याचा अधिक प्रयत्न लेखक आणि दिग्दर्शक दोन्ही भूमिका बजावणाऱ्या रमेश साहेबराव चौधरी यांनी केला आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Police beaten in Nigdi Three arrested
पुणे : निगडीत पोलिसांना मारहाण; तिघे अटकेत
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा

हेही वाचा >>> “ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल…”, लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली…

‘पाणीपुरी’ या चित्रपटाचा विषय खरं तर गंभीर आहे आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचाही आहे. पण लेखकाने त्यासाठी विषयाच्या खोलात न उतरता काही जोडपी आणि त्यांच्यातील वाद अशी आटोपशीर मांडणी केली आहे. त्यामागे मनोरंजन हा मुख्य उद्देश असल्याने फारसं उपदेशवजा अगदी जमादारांच्या मुख्य पात्राच्या तोंडूनही काही वदवलं गेलेलं नाही. आणि भावनिक संघर्ष आहे म्हणून ते अधिक गडद वा अत्यंत नाट्यमय पद्धतीने मांडण्याचा सोसही दिग्दर्शकाने केलेला नसल्याने माफक मनोरंजन करण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे. मात्र त्याचं श्रेय लेखकाच्या पात्ररचनेबरोबरच कलाकारांच्या अभिनयाला अधिक आहे.

चित्रपटात जमादार वकिलांची मुख्य भूमिका अभिनेता मकरंद देशपांडे यांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांत मकरंद देशपांडे यांना सातत्याने मराठी चित्रपटात भूमिका करताना पाहण्याची पर्वणी रसिकांना मिळाली आहे. त्यांची भूमिका ही त्यांच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. घटस्फोटाचे खटले यशस्वीपणे लढवणारा वकील म्हणून मिळालेल्या लोकप्रियतेची धुंदी आणि त्यात आपण आपल्याच मुलीचं नुकसान कसं केलं हे उमगल्यानंतर शहाणपण आलेलं एक बुजुर्ग व्यक्तिमत्त्व असे त्यांच्या व्यक्तिरेखेचे दोन पैलू त्यांनी लीलया साकारले आहेत. नाटकातील स्वगताप्रमाणे एखाददुसरा संवादही त्यांच्या वाट्याला आला आहे. तिथे क्वचित त्यांचा रंगभूमीवरचा प्रवेश पाहत असल्याचा भास होतो, मात्र तो सोडला तर त्यांची व्यक्तिरेखा उत्तम जमून आली आहे. हृषीकेश जोशी यांनी साकारलेला गोल्डमॅन हीसुद्धा एक उत्तम जमून आलेली भूमिका, किंबहुना चित्रपट जिथे जिथे रेंगाळतो तिथे हृषीकेश जोशी यांची विनोदी भूमिका आपल्याला खळखळून हसायला लावते. भारत गणेशपुरे यांचा बोडके मास्तर, कैलास वाघमारे याने साकारलेला सिद्धू, प्राजक्ता हनमघरची आर्ची या काही जमून आलेल्या व्यक्तिरेखा आणि कलाकारांनी चित्रपटात गंमत आणली आहे. हृषीकेश, कैलास, भारत यांच्यावर चित्रित झालेलं ‘सब घोडे बारा टक्के’ हे गाणंही जमून आलं आहे. त्या तुलनेत सायली संजीवच्या निमाला पुरेसा न्याय मिळालेला नाही. अभिनेता सुमीत राघवन याचं खुसखुशीत निवेदनही चित्रपटात आहे. खरं तर पटकथा आणि सरधोपट मांडणीमुळे आलेलं फिकेपण कलाकारांच्या अभिनयाने दूर केलं आहे. एक गमतीशीर कथा आणि उत्तम कलाकारांचा विनोदी अभिनय पाहण्याची संधी अशी ही मनोरंजनाची निव्वळ चटकदार पाणीपुरी आहे.

पाणीपुरी

दिग्दर्शक – रमेश साहेबराव चौधरी

कलाकार – मकंरद देशपांडे, सायली संजीव, हृषीकेश जोशी, भारत गणेशपुरे, कैलास वाघमारे, प्राजक्ता हनमघर, शिवाली परब, विशाखा सुभेदार, अनुष्का पिंपुटकर, अभय गीते, सचिन बांगर.

Story img Loader