अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद ही पुनर्पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. एकता कपूरच्या चंद्र नंदिनी या ऐतिहासिक मालिकेत श्वेता मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत अभिनेता रजत टोकसही तिच्यासोबत झळकेल. याव्यतिरिक्त इकबाल आणि मकडी यांसारख्या चित्रपटातून बालकलाकार म्हणून प्रसिद्धीस आलेली ही अभिनेत्री लवकरच रुपेरी पडद्यावरही झळकणार आहे. वरुण धवन आणि आलिया भट यांच्या बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटात ती भूमिका साकारताना दिसेल. विशेष म्हणजे ही तरुण अभिनेत्री आता प्रेमातही पडलीय. स्वतः श्वेतानेच याबाबत सांगितले.
श्वेता बसू प्रसाद ही निर्माता रोहित मित्तल याला गेली दोन वर्ष डेट करतेय. फॅन्टम फिल्म्स येथे या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दिग्दर्शक- निर्माता- अभिनेता अनुराग कश्यप याने या दोघांच्या प्रेमप्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे कळते. श्वेता तिच्या इन्स्टाग्राम अकाउन्टवरून रोहितसोबतचे बरेच फोटो शेअर करत असते.
‘मकडी’गर्ल अडकली प्रेमाच्या जाळ्यात
फॅन्टम फिल्म्स येथे या दोघांची भेट झाली होती.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 25-09-2016 at 10:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makdi fame shweta basu prasad dating a filmmaker