तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या प्रदीर्घ कालावधीत अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली. मालिका आणि त्यात पात्र प्रचंड लोकप्रिय असल्याने निर्मात्यांना त्या भूमिकेसाठी नवे कलाकार शोधण्याची मोठी अडचण आहे. ही मालिका सध्या मालिकेतील तारक मेहता आणि अभिनेता शैलेश लोढा यांच्यामुळे चर्चेत आहे. शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर निर्मात्यांनी त्यांना मनवण्याचे प्रयत्न केले, पण ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याने मालिकेत परतले नाहीत. त्यामुळे शेवटी निर्मात्यांनी त्यांच्या जागी नवीन कलाकाराची निवड केली आहे. दरम्यान, आता या मालिकेत आणखी एका कलाकाराच्या परतण्याची चाहते गेल्या काही वर्षांपासून वाट पाहत आहेत. त्या आहेत दयाबेन ही भूमिका साकारणाऱ्या दिशा वकाणी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Bigg Bossचे घर कुठे आहे? त्याची किंमत किती आणि मालकी कुणाची? जाणून घ्या


काही वर्षांपूर्वी गर्भारपणाचं कारण देत दिशा वकाणी यांनी मालिकेतून ब्रेक घेतला. मुलीच्या जन्मानंतर त्या मालिकेतील परत येतील, असं म्हटलं जात होतं परंतु त्या परतल्या नाहीत. गेल्या तीन वर्षात अनेकदा त्यांच्या परतण्याबद्दल चर्चा झाली. पण अजूनही दयाबेन हे पात्र साकारणाऱ्या दिशा स्क्रीनवर दिसत नाहीयेत. याबद्दल निर्माता असित कुमार मोदी यांनी त्यांच्या सेटवर नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिशा वकाणींच्या अनुपस्थितीबद्दल भाष्य केलं. तसेच दयाबेन हे पात्र मालिकेत लवकरच परत येईल, असंही म्हणाले.

KBC 14 : ७५ लाखांच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊनही २४ वर्षीय वेल्डर जिंकला फक्त ५० लाख; पाहा Video नेमकं काय घडलं?


“दया भाभीचे पात्र लोक अजून विसरले नाहीत. जवळपास पाच वर्षे झाली आणि लोक अजूनही तिच्याबद्दल बोलतात. या पात्राची आणि दिशा वकाणी यांची अनुपस्थिती माझ्यासह सर्वांनाच जाणवते. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. करोना महामारीच्या काळात आणि आजही त्या मालिकेत परततील, याची मी वाट पाहत आहे. लवकरच त्या परत येतील अशी मला आशा आहे,” असं असित कुमार मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makers of tarak mehta ka ooltah chashma asit modi says dayabhabhi aka disha vakani will reaturn in show hrc