२६ जुलैच्या पाऊस प्रलयात अनेक जणांचे अनेक प्रकारचे नुकसान झाले आणि त्याच्या आठवणी नकोशा वाटतात. असेच नुकसान अजय फणसेकर याची कथा-पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन असणा-या ‘पुरषोत्तम जोशी’‌ या चित्रपटाबाबतही झाले, त्याची निगेटिव्ह प्रिन्टस त्या पावसाच्या पाण्याने खराब झाली, वाया गेली. हा धक्का पचवून पुन्हा उभे राहणे अतिशय अवघड होते. तेवढी सगळी मेहनत द्यायची तर वेळ-पैसा-शक्ती पुन्हा खर्च करायची तयारी हवी.
अजय फणसेकर लेचापेचा नव्हता, तो पुन्हा उभा राहिला, नव्याने कामाला सुरुवात केली, आणि आपला हा फॅन्टसी चित्रपट पूर्ण केला. ते करताना आपल्याला आपल्यासोबतचे निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची साथ मिळाली हे तो न विसरता, पण भावपूर्णरित्या सांगतो.
सचिन शिंदे अजयसोबत निर्माता आहे तर दिलीप प्रभावळकर, सुहास जोशी, दीपक शिर्के, राजन ताम्हणे, शितल क्षिरसागर, प्रीति जोशी इत्यादींच्या भूमिका आहेत. तर छायादिग्दर्शन बी. लक्षमण, संकलन अरूण शेखर, पार्श्वसंगीत अमर मोहिले असे तंत्रज्ञ आहेत.
चित्रपट हे एक उत्तम टीमवर्क आहे त्याचा प्रत्यय अशा वेळी चांगल्या प्रकारे येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा