संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा’ हे गाणे सध्या सोशल मिडीयासह सर्वत्र विविध कारणांमुळे प्रचंड चर्चेत आहे. एकीकडे या गाण्यातील दीपिका आणि प्रियांका चोप्राचा लूक प्रेक्षकांना भावला असला तरी दुसरीकडे या गाण्यातून अयोग्य इतिहास मांडला जात असल्याच्या आक्षेपावरून हे गाणे वादातही सापडले आहे. कारण काहीही असो ‘येन केन प्रकारेन’ प्रसिद्धी मिळविण्यात ‘पिंगा’ गाणे चांगलेच यशस्वी ठरले आहे. हीच प्रसिद्धी एन्कॅश करण्यासाठीच की काय या गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओदेखील इरॉसकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओत गाण्याचे चित्रीकरण सुरू असताना कॅमेऱ्यामागील अनेक गंमती-जमती प्रेक्षकांना पाहायला मिळतील. याशिवाय, या गाण्यासाठी नृत्याचा सराव करताना आणि प्रत्यक्षात नृत्य करताना दीपिका-प्रियांकाला घ्यावी लागलेली मेहनत आणि मजेशीर क्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा