बॉलिवूडमधील नेहमी चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. हे दोघे गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी मलायका आणि अर्जुन एकत्र दिसतात. परंतु आता मलायका अर्जुनला सोडून पुन्हा अरबाज खानकडे परतणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. याचे कारणही तसेच खास आहे. मलायका अरोरा आणि अरबाझ खान नुकतेच एकत्र दिसले होते. दोघेही विमानतळावर एकत्र दिसले. मलायका आणि अरबाझ त्यांचा मुलगा अरहान खानला सोडण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले होते. यावेळचे त्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मलायका आणि अरबाजचे अरहानसोबतचे हे व्हिडिओ सध्या चर्चेत आले आहेत.

हेही वाचा : “या परिस्थितीला बॉलिवूड कलाकारच जबाबदार…” अभिनेते मुकेश खन्ना यांनी घेतला कलाकारांचा समाचार

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Saif Ali Khan Attacked With Knife At Home
हल्ल्यानंतर सैफच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचली लेक सारा अली खान, सोबतीला होता भाऊ इब्राहिम, पाहा व्हिडीओ
Encounter Specialist Daya Nayak Arrives at Saif Ali Khan home
Video: एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पोहोचले सैफ अली खानच्या घरी, तपासाचा व्हिडीओ आला समोर

मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान सध्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत असून तो चित्रपट निर्मितीशी संबंधित शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. मलायका आणि अरबाझ दोघेही २०१७ साली एकमेकांपासून विभक्त झाले. परंतु ते नेहमीच त्यांच्या मुलासाठी एकत्र येताना दिसतात. मुलासाठी फॅमिली फंक्शनमध्ये सहभागी होण्याचा विषय असो किंवा सुट्टीवर जाण्याचा विषय असो, दोघांनीही मतभेद विसरून मुलासाठी एकमेकांना साथ दिली आहे. आता विमानतळावरील हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स अरहानसाठी कमेंट करताना दिसत आहेत.

एका युजरने ‘नाइस फॅमिली’ अशी कमेंट केली आहे, तर एकाने ‘मलायका मॅम पॅचअप करा, देवाने तुम्हाला एवढा चांगला मुलगा दिला आहे’, अशीही कमेंट केली आहे. अरहानसाठी एका युजरने कमेंट करत म्हटले आहे की, ‘या मुलांचे आयुष्य काय असते, पालक असूनही नाही. आपण अशी कल्पनाही करू शकत नाही’, आणखी एक युजर म्हणतो आहे की, ‘हा मुलगा या परिस्थितीला कसे सामोरे जातोय?’. एकाने कमेंट केली आहे की, ‘आई वडिलांचा घटस्फोट झाल्याने तो किती नैराश्य अनुभवत असेल याचा विचार येतो. आपण विभागले गेलो आहोत असंही कदाचित त्याला वाटत असेल. दिसताना सर्व चांगलं दिसत आहे, पण शांती नाही. कारण मुलाला आई आणि बाबा दोघांसोबत राहायचे असते.’

आणखी वाचा : “…तोपर्यंत मलायकाशी लग्न करणार नाही”; अर्जुन कपूरचा खुलासा

मलायका अरोरा आणि अरबाझ खान पुन्हा एकदा एकत्र यावेत अशी अपेक्षा नेटकरी करत आहेत. पण खरोखर तसे होणार का? हे येत्या काही काळात समोर येईल. दरम्यान, मलायका अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये असून अरबाज खान जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत आहे.

Story img Loader