छोट्या पडद्यावरील सर्वात विवादित शो म्हणून ओळखला ‘बिग बॉस १५’चं ओटीटी व्हर्जन अखेर सुरू झालं. गेल्या अनेक दिवसांपासूनची या शोसाठीची प्रेक्षकांची प्रतिक्षा अखेर संपलेली आहे. टीव्हीवर येण्याआधी हा शो डिजीटल प्लॅटफॉर्म वूटवर सुरू झालाय. याला ‘बिग बॉस ओटीटी’ असं नाव देण्यात आलंय. या शोच्या प्रीमियरमध्ये अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या जबरदस्त डान्सने प्रेक्षकांना घायाळ केलं. यावेळी मलायकाने ‘परम सुंदरी’ या गाण्यावर डान्स परफॉर्म करत आपल्या अदाकारीने शोच्या प्रीमियरमध्ये ग्लॅमरचा तडका लावलाय.

वूट सिलेक्टने मलायका अरोराच्या डान्सचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. मलायका अरोराची ही अदाकारी पाहिल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाची पातळी आणखी उंचावली आहे. व्हिडीओमध्ये मलायका अरोरा नुकतंच रिलीज झालेल्या ‘मिमी’ चित्रपटातील ‘परम सुंदरी’ या गाण्यावर धमाकेदार डान्स केलाय. या व्हिडिओमध्ये मलायका गाण्याचे हुक स्टेप करताना दिसत आहे. गोल्डन साडीमध्ये ठुमके लावतानाचे मलायकाचं हे सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढले आहेत. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

नेहमीप्रमाणेच मलायका यावेळी सुद्धा खूप सुंदर दिसून आली. डान्स आणि अदाकारीच्या स्पर्धेत कुणीची तिच्याशी बरोबरी करू शकत नाही. जेव्हा मलायका स्टेजवर असते तेव्हा प्रेक्षकांचे डोळे फक्त तिच्यावरच असतात.

आणखी वाचा : टीव्ही स्टार प्रतीक सहजपालची जबरदस्त एन्ट्री; शायरी ऐकून करण जोहर चक्रावला!

काही दिवसांपूर्वी वूट सिलेक्टने आणखी एक प्रोमो रिलीज केला होता. यात बिग बॉस ओटीटीचा होस्ट करण जोहर घराच्या आत पहिले पाऊल टाकताना दिसला होता. त्याचबरोबर त्याच्या या व्हिडिओमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाचा टायगर ट्रॅक झळकत आहे. करण जोहरच्या या व्हिडिओमध्ये, बिग बॉस 15 चे हे घर इतर सीझनच्या घरापेक्षा बरेच वेगळे दिसते. बिग बॉस ओटीटीचा भव्य प्रीमियर आज रात्री 8 वाजल्यापासून सुरू झालाय. टीव्हीच्या सहा आठवडे आधी OTT प्लॅटफॉर्म Voot Select वर हा शो दाखवला जात आहे.