बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण यावेळी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे मलायका सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.
मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका जीमवरून येत असल्याचे दिसते. मलायकाचा जीम लूक काही नेटकऱ्यांना आवडला आहे. तर काही नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल केलं आहे.
आणखी वाचा : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ ही भूमिका
आणखी वाचा : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नवीन बंगल्या पेक्षा चर्चा रंगली बाथरूमची, जाणून घ्या कारण
मलायकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेकांनी तिला सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘पैसे खर्च केल्यानंतर कोणतीही मुलगी सुंदर दिसते.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मॅडमच्या वॉकला काय झालं काय माहित.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘नमस्ते काकू.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘कामवाली बाई’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल केले आहे.