बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलायकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायकाने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि तपकिरी रंगाचं हाफ स्वेटर परिधान केलं आहे. मलायकाने शॉर्ट्स देखील परिधान केली आहे. पण तिने परिधान केलेला शर्ट आणि स्वेटर हे मोठं असल्याने पॅंट दिसत नसल्याने तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
आणखी वाचा : ‘यांना थोडा शिष्टाचार शिकवा…’ एअर हॉस्टेसच्या वागणुकीवर संतापली अभिनेत्री

आणखी वाचा : ‘विक्रम वेधा’तला सैफचा लूक पाहून करीना म्हणाली, “माझा पती आधीपेक्षा…”
मलायकाचा हा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला,”ताई, घाई-घाईत पॅंट घरीच विसरल्या.” दुसरा नेटकरी म्हणाला, “ही स्त्री कधी वरचे कपडे परिधान करते, तर कधी खालचे ती कधीच पूर्ण कपडे परिधान करत नाही.” तिसरा नेटकरी म्हणतो, “ओके, मास्क असणं गरजेच आहे पॅंट परिधान करण नाही.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “माझ्या आजोबांकडेही असचं स्वेटर आहे.”