बॉलिवूडमधील अतिशय हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. वयाच्या ४८व्या वर्षी देखील मलायकाचा जलवा कायम आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओमुळे तिला नेटकऱ्यांनी पाठिंबा दिला असून फोटोग्राफरला सुनावले आहे.
बॉलिवूडमधील गर्ल गँग मलायका अरोरा, करीना कपूर खान आणि अमृता खान या लंचसाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी मलायकाने काळ्या रंगाची पँट आणि बॅकलेस टॉप परिधान केला होता. या लूकमध्ये मलायका अतिशय हॉट दिसत आहे. त्यावेळी काही फोटोग्राफर्सने तिचा व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये ती रेस्टॉरंटमधून निघून तातडीने गाडीत जाऊन बसते. गाडी बसताना फोटोग्राफरने चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ केल्यामुळे मलायकाचे चाहते फोटोग्राफरवर संतापले आहेत.
Video: फोटोग्राफर्सला पोझ देत असताना वारा आला अन्…; शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल
मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका यूजरने ‘अरे तुम्ही कुठेही कॅमेरा झूम का करता’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही असे काही झूम करता आणि सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर पोस्ट करता’ असे म्हणत फोटोग्राफरला सुनावले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूरचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अर्जुनने मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसेच मलायकाने देखील त्यावर कमेंट करत हार्ट इमोजी वापरले.