बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील ती नेहमीच चर्चेत असते. मलायकाचे लाखो चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा तिच्या फॅशनमुळे मलायका सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने सोशल मीडियावर असलेल्या कमेंट वाचल्यानंतर तिच्या आई-वडील अस्वस्थ झाल्याचे तिने सांगितले.
मलायकाने नुकतीच पिंकव्हिलाला मुलाखत दिली. यावेळी ट्रोल्सवर संताप व्यक्त करत मलायका म्हणाली, “मी यावर विचार करायचं आधीच बंद केलं आहे. पण माझे आई-वडिल नेहमीच बोलतात की, बेटा तुझ्या विषयी काही लोक असे बोलतात तर काही लोक हे बोलतात. मग एक दिवस मी त्यांच्यासोबत बसली आणि म्हणाली हा कचरा आहे ते वाचणं बंद करा. या फालतू गोष्टींवर विचारण करणं थांबवा.”
आणखी वाचा : Lock Upp : ट्रान्सवूमन सायशा शिंदे ‘या’ स्पर्धकाच्या प्रेमात!
पुढे मलायका म्हणाली, “काही झालं तरी ते माझे आई-वडील आहेत. माझ्याविषयी काही ऐकलं किंवा वाचलं तर त्यांना वाईट वाटणारच आहे. पण आता मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि आता ते अशी गोष्ट परत बोलणार नाही. जर हेच कपडे रिहाना किंवा जेनिफर लोपेजनं परिधान केलं असतं तर कोणी काही बोललं नसतं. तिचे कपडे आपण परिधान केले तर लोक लगेच आपल्याला ट्रोल करतात.”