अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या हटके फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचदा मलायकाला तिच्या कपड्यांवरुन ट्रोल देखील केलं जातं. पण ती या सगळ्याकडे दुर्लक्ष करते. फॅशनच्याबाबतीत नवनवीन प्रयोग करणं आणि तितक्याच आत्मविश्वासाने प्रत्येक ड्रेस परिधान करणं ही मलायकाची खासियत आहे. आता पुन्हा एकदा ती तिच्या ट्रान्सपरंट ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. तिचा नव्या लूकमधील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Video : तीन वेळा आयव्हीएफ, हाती अपयश अन् गंभीर आजाराचं निदान, अभिनेत्रीला कॅमेऱ्यासमोर अश्रू अनावर 

मलायकाने मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका फॅशन शोला हजेरी लावली होती. या शोसाठी तिने काळ्या रंगाचा सी थ्रु ड्रेस परिधान केला होता. अभिनेत्रीच्या या ट्रान्सपरंट ड्रेसने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं. मलायकाच्या उपस्थितीने या शोला चार चाँद लागले. इतकंच नव्हे तर तिने रॅम्प वॉकही केलं. मलायकाने रॅम्प वॉकवर एण्ट्री करताच उपस्थितांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. या आकर्षक ड्रेसवर तिने हाय हिल्स घालणं पसंत केलं.

पाहा व्हिडीओ

वयाच्या ४८व्या वर्षी देखील मलायकाचं निखळ सौंदर्य आणि फिटनेस पाहून अनेकजण तिचं कौतुक करत होते. तसेच सोशल मीडियावर तिचा हा रॅम्प वॉकचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून मलायकाच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. “वयाच्या ४८व्या वर्षी देखील इतकी सुंदर कशी दिसतेस?” असं एका युजरने म्हटलं आहे. तर तिच्या ड्रेसचं कौतुकही अनेकांनी केलं आहे. काहींनी मलायकाचा ट्रान्सपरंट ड्रेस पाहून तिला ट्रोल देखील केलं आहे. 

आणखी वाचा – “अक्षु मला सोडून गेला अन्…” भावाच्या निधनानंतर केतकी माटेगावकरला दुःख अनावर, शेअर केली भावूक पोस्ट 

मलायका सुंदर दिसण्यासाठी अधिकाधिक मेहनत घेताना दिसते. नियमित व्यायाम, योगा हा तिच्या दिनक्रमाचा भाग आहे. हेल्दी डाएटकडे तिचं अधिक लक्ष असतं. मलायकाने कोणत्याही पद्धतीचा ड्रेस परिधान केला तरी ती त्याच्यामध्ये अगदी उठून दिसते. तिचा हा नव्या लूकमधील व्हिडीओ याचंच एक उत्तम उदाहरण आहे.