बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मलायका अरोराला ओळखले जाते. ती कायमच तिच्या हटके फॅशन स्टाइलमुळे प्रसिद्धीझोतात असते. बॉलिवूडची ग्लॅमरस डॉल म्हणून तिला ओळखले जाते. मलायकाला फॅशनबरोबरच फिटनेससाठीही ओळखले जाते. यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. सध्या ती तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शो मुळे चर्चेत आहे. यात तिच्या शोमध्ये खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे करताना दिसत आहे.
अभिनेत्री मलायका अरोराचा ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा रिअलिटी शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये मलायकाने तिचा पूर्वाश्रमीचा पती, बॉयफ्रेंड अर्जुन कपूर आणि मुलगा अरहान यांच्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्याबरोबरच तिने तिची ताकद, कमजोरी आणि भीती याबद्दलही भाष्य केले आहे. याबरोबर ती त्यावर एक एक करुन कशी मात करण्याचा प्रयत्न करत आहे, याबद्दलही तिने सांगितले आहे.
आणखी वाचा : “मला घरातून बाहेर…” मलायकाने सांगितले अरबाज खानशी लग्न करण्याचे खरे कारण
या मुलाखतीत तिला तू चित्रपटात अभिनय करण्यास टाळाटाळ का करतेस? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने फार स्पष्टपणे उत्तर दिले. “मी या गोष्टींना टाळत नाही. पण मला याबद्दल खात्री नाही. खरं सांगायचं तर मला अभिनयाची भीती नाही. पण मला संवाद बोलताना अस्वस्थ वाटते. लोकांसमोर उभे राहणं आणि एखादा संवाद बोलताना त्या भावनेशी स्वत:ला जोडावं लागतं. पण मला याबद्दल नेहमीच थोडी भीती वाटते. म्हणूनच कदाचित मी त्यापासून दूर पळत असेन”, असे मलायका म्हणाली.
“गेल्या काही वर्षांमध्ये मला अनेक स्क्रिप्ट्ससाठी विचारणा करण्यात आली आहे. यातील अनेक स्क्रिप्ट्स मी बघितल्या आहेत, वाचल्या आहेत. पण तरीही मी यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे. ही माझी एक भीती आहे. मला शाळेतही एखादी गोष्टी सांगायची असेल तेव्हा मी घाबरुन जायची. हे सर्वात कठीण काम आहे, असे मला वाटायचे. माझ्यावर खूप दबाव आहे, असेही वाटत राहायचे. मी खूप अस्वस्थ असायचे. जेव्हा मला एखादी गोष्ट शिकायची असेल तेव्हा मी काहीही खाऊ शकत नव्हते, मला झोप यायची नाही. त्यामुळेच माझ्या मनात ती भीती कायम आहे”, असेही तिने म्हटले.
आणखी वाचा : “मी नेहमी तुझ्याबरोबर…” वीणा जगताप आणि शिव ठाकरे पुन्हा येणार एकत्र, पोस्ट चर्चेत
तिने दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर ती अभिनयाला घाबरत असल्याचे बोललं जात आहे. पण चित्रपटात अभिनय न करताही तिने आपल्या नृत्याच्या जोरावर सिनेसृष्टीत चांगले करिअर केले आहे. तिने आतापर्यंत अनेक डान्स शो चे परिक्षक म्हणून काम पाहिलं आहे. यात ती फारच चांगल्या पद्धतीने परिक्षण करताना दिसते.