बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. फिटनेसच्या बाबतीत अतिशय जागरुक असणाऱ्या मलायकाच्या सोशल मीडिया पोस्ट बरेचदा व्हायरलही होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच मलायकाच्या कारला अपघात झाल्यानंतर तिनं सोशल मीडियावर स्वतःचा कोणताही फोटो शेअर केला नव्हता. पण आता मात्र तिने अपघातानंतर पहिल्यांदाच एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होताना दिसत आहे.

मलायका अरोरा पुण्यातील एक फॅशन इव्हेंट आटोपून मुंबईमध्ये परतत असताना तिच्या कारला अपघात झाला होता. ज्यात मलायकाच्या कपाळाला किरकोळ दुखापत झाली होती. त्यानंतर आज पहिल्यांदाच तिने एक सेल्फी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये तिने ब्लॅक कलरचा टॉप आणि डोक्यावर कॅप घातलेली दिसत आहे. तिचा हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा फोटो शेअर करताना तिने त्याला, ‘हिलिंग’ असं कॅप्शनही दिलं आहे.

आणखी वाचा- Durex ने आलिया-रणबीरला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा! शेअर केली मजेदार पोस्ट

दरम्यान मलायका अरोराचा काही दिवसांपूर्वीच अपघात झाला होता. पुण्यातील एका फॅशन इव्हेंटमधून मुंबईला येत असताना तीन गाड्यांच्या झालेल्या अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २ एप्रिलला मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल प्लाजाजवळ ही दुर्घटना घडली होती.

आणखी वाचा- The Kashmir Files नंतर विवेक अग्निहोत्रींचा ‘दिल्ली फाइल्स’, ‘या’ विषयावर आधारित आहे आगामी चित्रपट

या अपघातानंतर मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर तिची काळजी घेताना दिसला होता. मलायकाला भेटण्यासाठी बॉयफ्रेंड अर्जुन कपूर तिच्या घरी पोहोचला होता. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत होता. मलायका आणि अर्जुनच्या नात्याबद्दल बोलायचं तर दोघंही मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. त्यांनी आपलं नातं सर्वांसमोर खुलेपणानं मान्य केलं आहे. मलायका अर्जुनपेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठी आहे. मलायका अरोरा २०१७ मध्ये अरबाज खानपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर ती अर्जुन कपूरला डेट करत आहे.

Story img Loader