अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या करिअरपेक्षा खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. अभिनेता अरबाज खानपासून वेगळं झाल्यानंतर मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशिपमध्ये आहे. या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसते. काही दिवसांपूर्वीच मलायका आणि अर्जुन यांचं ब्रेकअप झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यावर मलायका अरोरानं प्रतिक्रया दिली आहे. मलायकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे ज्यांचा संबंध त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांशी जोडला जात आहे.

मलायका अरोरानं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं अशाप्रकारच्या ब्रेकअपच्या चर्चांवर राग व्यक्त केला आहे. तिने लिहिलं, ‘जर तुम्हाला वयाच्या ४० वर्षी प्रेम मिळालं तर ही सामान्य गोष्ट आहे असं समजायला हवं. वयाच्या ३० वर्षी जर तुम्ही नवी स्वप्न पाहत असाल आणि ती पूर्ण करण्याची तयारी ठेवत असाल तर यात नवीन काहीच नाही आणि वयाच्या ५० व्या वर्षीही तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्देश शोधू शकता. तुमचं आयुष्य २५ व्या वर्षी संपत नाही. त्यामुळे असं वागणं बंद करा आणि स्वतःचे विचार बदला.’

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

दरम्यान अर्जुन कपूरनं सोशल मीडियावर मलायकासाठी पोस्ट शेअर करत त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यानं मलायकासोबतचा एक मिरर सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं होतं, ‘अफवांना जागा नाही. सुरक्षित रहा, आनंदी रहा, खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना खूप प्रेम…’ त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरलही झाली होती. विशेष म्हणजे अर्जुन कपूरने हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर मलायका अरोरानेही कमेंट केली होती. कमेंट करताना तिने काहीही न लिहिता फक्त हार्ट इमोजी शेअर केला होता.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. दोघंही नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांना सोशल मीडियावर नेहमीच ट्रोल केलं जातं. मलायका अरोरा अर्जुन कपूरपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे जेव्हा हे दोघंही सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करतात त्यावेळी त्यांना ट्रोल केलं जातं. पण मलायका अर्जुन अशा ट्रोलिंगकडे नेहमीच दुर्लक्ष करताना दिसतात.

Story img Loader