बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखली जाते. मलायका सध्या चित्रपटात दिसत नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या फिटनेसमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक जीवनामुळे. मध्यंतरी मलायकाला करोनाची लागन झाली होती तेव्हा तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून करोनाच्या लसीची प्रतिक्षा करत असल्याचे सांगितले होते. आता मलायकाने थेट करोना लसीचा पहिला डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करोना लस घेतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो लिलावती रूग्णालयातील असल्याचे फोटोतून दिसत आहे. मलायकाने या फोटोत पांढऱ्या रंगाचा टॉप, लाल मास्क आणि काळ्या रंगाची ट्रॅकपॅन्ट परिधान केल्याचे दिसत आहे. “आज मी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, कारण आपण सगळे एकत्र येऊन या व्हायरसशी लढा देणार आहोत, आणि जिंकणार आहोत. लवकरच लस घेण्यास विसरू नका! आणि हो मी लस घेण्यास पात्र आहे!” अशा आशयाचे कॅप्शन मलायकाने तो फोटो शेअर करत दिले आहे. मलायकाने या कॅप्शनमध्ये फ्रंटलाइन वर्कर्स म्हणजे डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी यांचे आभार मानले आहे. मलायकाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिची पोस्ट पाहून अनेक चाहते आम्ही सुद्धा आताच जाऊन लस घेऊ असे म्हटले आहे.
१ एप्रिल पासून ४५ वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण सुरू झाले आहे. दरम्यान, मलायका ही ४७ वर्षांची असून तिने थोडा सुद्धा वेळ न घालवता करोनाची लस घेतली आहे. या आधी करोनाची लागन झाल्याने मलायकाने सुरक्षित राहण्यासाठी लस घेतली आहे.