आज १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या साथीदारासोबत घालवतात आणि प्रेम व्यक्त करतात. याच निमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायका अर्जुनला मिठी मारताना दिसते. मलायकाने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट्स परिधान केली आहे. तर अर्जुनने काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केली आहे. हा फोटो शेअर करत तू माझा आहेस, असे कॅप्शन देत मलायकाने अर्जुनला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : रितेश देशमुखचा ‘नाच’ पाहून जिनिलिया संतापली, मजेदार Video Viral
आणखी वाचा : राजेश खन्नासोबत ब्रेकअपनंतर अंबानींच्या सुनेला B-Grade चित्रपटात करावे लागले होते काम!
दरम्यान, मलायका आणि अर्जुन गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. तर मलायकाने २०१७ मध्ये अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिला. अरबाज आणि मलायकाला एक मुलगा असून अरहान खान असे त्याचे नाव आहे.